Halal Lifestyle Township: कर्जतमधील हलाल सोसायटी वादाला नवं वळण, ममदापूरच्या गावकऱ्यांनी खरं सत्य आणलं समोर
- Published by:Sachin S
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
पण, जाणीवपूर्वक मुस्लिम समाज वाढवण्याचे हे काम असून यामुळे सामाजिक वातावरण खराब होतंय, असा आरोप आता केलाय जातोय.
कर्जत : सोसायटीत घर घ्यायचे असेल आणि तुम्ही मुस्लिम असाल तरच तुम्हाला घर मिळेल, अशा प्रकारची एक जाहिरात झळकली आणि बघता बघता वातावरण पेटले आणि हाच वाद आता थेट हिंदू मुस्लिम वादावर येवून पोहोचला. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील नेरळ भागात दामत आणि ममदापूर सुकून एम्पायर नावाने हलाल लाईफस्टाईल म्हणून एक टाऊनशिप प्रोजेक्ट लाँच केला आहे. ज्या वरुन वाद पेटला. मात्र, गावकऱ्यांनी या प्रकरणाचं खंडन केलं आहे.
सुंदर इमारत, अनेक सुख सुविधा पाहून कोणालाही या इमारतीत घर घ्यावसं वाटेल पण ही जाहिरात पाहून तुम्हाला या इमारतीत घर घ्यायची इच्छा होईल का? कारण या जाहिरातीनुसार या इमारतीत फक्त मुस्लिमांनाच घर घेता येईल अशीच जाहिरात केली आहे. त्यात हलाल लाईफस्टाईल म्हणून या इमारतीतील सुख सुविधा असतील याचा अर्थ काय तर मुस्लिम धर्मियांनाच इथं राहता येईल, अशी ही जाहिरात सांगते. यावरुनच एक वाद पेटला तो थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला आणि आयोगाने राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करायला सांगितलं आहे.
advertisement
पण, जाणीवपूर्वक मुस्लिम समाज वाढवण्याचे हे काम असून यामुळे सामाजिक वातावरण खराब होतंय, असा आरोप आता केलाय जातोय. ज्या ममदापूर आणि दामतमध्ये या इमारती आहेत तिथे हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदत आहेत. या वादाला राजकीय किनार आहे असा आरोप स्थानिक मुस्लिम तरुणांनी केला आहे. या इमारतीत फक्त मुस्लिमांना घरे दिली जातील अशी जाहिरात केली गेली होती, ज्यात मुस्लिम महिला आणि पुरुष दाखवले गेले होते. पण मुळात असा वाद नसून राजकारण केले जात आहे. या भागात हिंदू मुस्लिम एकत्र राहत असून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जातोय. सत्य परिस्थिती अशी नसून यामुळे गावाचे नाव खराब होत असून या गावात हिंदू मुस्लिम एकत्र नांदत आहेत. जर कोणी बिल्डर असा करत असेल त्याची शहानिशा केली जावी आणि कारवाई करावी, असा मागणी ममदापूरचे माजी सरपंच पुंडलिक शिनारे आणि गावकऱ्यांनी केली.
advertisement
ममदापूर आणि दामत नेरळ अशी अनेक गावं आहेत, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पासूनची आहेत. या गावांत प्रत्येक हिंदू सण आणि मुस्लिम सण साजरे केले जातात. खरंतर नेरळ परीसरात हिंदू मुस्लिम वस्ती आता समसमान प्रमाणात आहे. इथं हिंदू मुस्लिम वाद फार तुरळक प्रमाणात होतात. पण हलाल लाईफ स्टाईलवरुन जो वाद पेटला आहे, त्या मागे अनेक कारणांपैकी एक राजकीय कारण ही समोर आलंय, कारण या गावांमध्ये पुढील दोन महिन्यात सरपंच पदाच्या निवडणुका आहेत.
view commentsLocation :
Karjat,Raigad,Maharashtra
First Published :
September 05, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Halal Lifestyle Township: कर्जतमधील हलाल सोसायटी वादाला नवं वळण, ममदापूरच्या गावकऱ्यांनी खरं सत्य आणलं समोर


