जळगावात भाजप विरुद्ध खडसे पुन्हा संघर्ष पेटला, मंगेश चव्हाणांनी डिवचलं, युतीवरून फटकारे

Last Updated:

Jalgaon Politics: भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मंगेश चव्हाण-एकनाथ खडसे
मंगेश चव्हाण-एकनाथ खडसे
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खडसे एमआयएमसोबतही युती करू शकतात, असे म्हणत राजकारणातील त्यांच्या लवचिकतेवर मंगेश चव्हाण यांनी टीका केली.
एकनाथ खडसे यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण त्यांना आमच्याशी युती करायची नाही. आम्ही त्यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मात्र ते एमआयएम सोबत देखील युती करू शकतात. त्यांच्या विषयाला आम्हाला काही अडचण नाही. त्यांनी जिल्ह्यात फिरावं, लोकांमध्ये जावं आणि त्यांना काय प्रतिक्रिया मिळतात ते पाहावं. त्यानंतर त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा, असे मंगेश चव्हाण म्हणाले.
advertisement

'सबमाल डब्बे में' अशी एकनाथ खडसे यांची परिस्थिती, चव्हाणांनी डिवचले

गेल्या लोकसभेला त्यांनी भाजपाचेच काम केले. एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात. लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजपा नकोय. त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही. एकनाथ खडसे कधीच एका मतावर ठाम राहत नाहीत. 'सबमाल डब्बे में' अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही मात्र ठरल्याप्रमाणेच युती करणार आहोत. अशी टीका चव्हाण यांनी केली.
advertisement

निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष चिघळण्याची चिन्हे

जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असताना चव्हाण यांच्या या विधानामुळे खडसे-चव्हाण संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या वक्तव्यामुळे भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि इतर आघाड्यांची रणनीती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावात भाजप विरुद्ध खडसे पुन्हा संघर्ष पेटला, मंगेश चव्हाणांनी डिवचलं, युतीवरून फटकारे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement