Gunaratna Sadavarte: मराठे गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत आहे, सदावर्तेंचा कोर्टात खळबळजनक दावा
- Published by:Prachi Amale
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
मनोज जरांगे यांचे समर्थक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा खळबळजनक दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात केला आहे.
मुंबई : आंदोलन हाताबाहेर गेलं... आंदोलनासाठी दिलेल्या अटी-शर्थींचं पालन व्हायलाच हवं, मुंबई उच्च न्यायलयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. जरांगे यांचे समर्थक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा सदावर्ते यांचा न्यायालयात खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा वाद आता न्यायालयात पोहोचला असून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळं घडवून आणलं जात आहे. असा युक्तिवाद सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केलाय. तर सरकार आंदोलकांना बाहेर काढू शकत नाही. तुम्ही आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तसेच मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचा अवमान केला आहे, असा सदावर्तेंनी न्यायालयात दावा केला आहे. जरांगे यांचे समर्थक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा सदावर्ते यांचा न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे.
advertisement
राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू... सदावर्तेंचा दावा
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मी 29 तारखेला तक्रार दिली, आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली. लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही, असे गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात म्हटले. तसेच, आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू आहे, असेही सदावर्तेंनी म्हटलं.
advertisement
जरांगेंना आंदोलन थांबवण्यास का सांगत नाही?
अजून आंदोलनकर्ते मुंबईत येत आहेत, त्यांना कसं अडवणार? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे जरांगे पाटील यांनी उल्लंघन केल्याची माहिती राज्य सरकारने दिली. त्यांनी अटी शर्तीनुसार आंदोलन करण्याचं मान्य केलं होतं. कोर्टाने जरांगे पाटील यांना निर्देश द्यावेत. पोलीस देखील कायद्यानुसार पावलं उचलतील, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. जर कायद्याचे उल्लंघन झालं तर तुम्ही त्यांना का सांगत नाही? तुम्ही आंदोलन थांबवा हे तुम्ही त्यांना का सांगत नाही? असा सवाल देखील हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला. तसेच आता आंदोलन हाताबाहेर गेले आहे, असे देखील हायकोर्टाने म्हटले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gunaratna Sadavarte: मराठे गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत आहे, सदावर्तेंचा कोर्टात खळबळजनक दावा


