एका घरातून एक वाहन न्यायचं, मनोज जरांगेंच्या गावागावात जोर-बैठका, गणोशोत्सवात मराठ्यांचं वादळ मुंबईत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maratha Reservation Protest: बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीनशे गावात बैठका पार पडल्या. या बैठकीत आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. याचीच तयारी गाव खेड्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. आता पूर्णपणाने आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरायचे नाही, असा निर्धार समाज बांधवांसमोर जरांगे पाटील बोलून दाखवत आहेत.
बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीनशे गावात बैठका पार पडल्या. या बैठकीत मुंबईला जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. मंगळवारी बीड जवळील पालवन या गावात बैठक पार पडली. या बैठकीतून एक गाव, एक वाहन ही संकल्पना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था या माध्यमातून केली जात आहे.
advertisement
मुंबईच्या आंदोलनासाठी गावागावात जोरबैठका
आरक्षणाची ही शेवटची लढाई असून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी मुंबईला यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील हे बैठकीच्या गावागावात करीत आहेत. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात येत होत्या, त्या आजतागायत सुरू आहे. बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आहे.
advertisement
मोर्चाआधी सरकारशी कोणत्याही प्रकारे चर्चा करणार नाही, जरांगेंची भूमिका
मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाणार आहे पण मोर्चाआधी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.
गणपतीत दंगली करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा डाव-लक्ष्मण हाके
advertisement
बीड शहर जरांगेंनी जाळले, त्याच गोष्टी त्यांना आता गणेशोत्सव काळात मुंबईत करायच्या आहे. गणपतीत दंगली करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका घरातून एक वाहन न्यायचं, मनोज जरांगेंच्या गावागावात जोर-बैठका, गणोशोत्सवात मराठ्यांचं वादळ मुंबईत









