Manoj Jarange Patil Maratha Reservation : पहाटेपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं? मनोज जरांगेच्या निर्णयामागचे 10 मुद्दे
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आज, सकाळी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयामागची त्यांनी काही कारणेदेखील सांगितली.
अंतरवाली सराटी : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी उतरण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जरांगे पाटील यांनी मतदारसंघाची घोषणादेखील केली होती. मात्र, आज सकाळी उमेदवारांच्या नावाची घोषणा न करता त्यांनी थेट निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा केली. जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मध्यरात्री 3.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
>> निवडणुकीतून माघारीची कारणे काय?
मनोज जरांगे पाटील यांनी आज, सकाळी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयामागची त्यांनी काही कारणेदेखील सांगितली. आपण निवडणुकीतून माघार घेत असलो तरी कोणाला पाडायचे हे सांगणार नसल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीतून माघार हा आमचा निर्णय गनिमी कावा असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
advertisement
- पहाटेपर्यंत जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी आली नाही
- आम्हाला एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.
- मी राजकारणात एकदम नवीन आहे. एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
- आपल्याला निवडणूक लढायची नाही. आपली फसगत होईल, आपले अर्ज काढून घ्या एकही अर्ज ठेवून घेऊन नका असे आवाहन जरांगे यांनी केले.
advertisement
- आपलं आंदोलन सुरूच आहे, पुन्हा एकदा निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरूच राहणार आहे
- एका जातीवर जिंकणं आपण जिंकू शकत नाही. सगळ्यांसोबत चर्चा केली, आपण निवडणूक लढायची नाही हा निर्णय घेतला.
- माझी इच्छा नाही की याला आणि पाड म्हणायची इच्छा नाही
- लोकांना जे करायचं ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा
advertisement
- मतदारसंघ ठरवलेत मी, फक्त उमेदवारांचे नाव ठरवायचे होते
- निवडणुकीतून माघार नाही हा गनिमी कावा, पुन्हा सांगतो मी निवडणुकीतून माघार घेतली नाही
- काय पाडा आणि कुणाला पाडा हे मी सांगणार नाही .
- कोणत्याही अपक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही
- एका जातीवर निवडणूक लढणं अवघड आहे म्हणून आपण आपले अर्ज काढून घ्या - उमेदवारांना जरांगेंच्या सूचना
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 04, 2024 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil Maratha Reservation : पहाटेपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं? मनोज जरांगेच्या निर्णयामागचे 10 मुद्दे








