Naigaon BDD Chawl: बीडीडीवासीयांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार! नायगावात नवीन घरांचा लवकर ताबा देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील

Last Updated:

Naigaon BDD Chawl: नायगावमध्ये बीडीडीच्या 42 चाळी असून संपूर्ण प्रकल्प 6.5 एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे.

Naigaon BDD Chawl: बीडीडीवासीयांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार! नायगावात नवीन घरांचा लवकर ताबा देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील
Naigaon BDD Chawl: बीडीडीवासीयांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार! नायगावात नवीन घरांचा लवकर ताबा देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील
मुंबई : नायगाव येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांना म्हाडातर्फे दिवाळीपूर्वीच नवीन घरांचा ताबा मिळू शकतो. त्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी म्हाडाने वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवापूर्वी नवीन घरांचा ताबा दिला होता. नायगावमध्ये बीडीडीच्या 42 चाळी असून संपूर्ण प्रकल्प 6.5 एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात साधारण 3 हजार 400 पैकी 864 फ्लॅट्स असलेल्या नव्या इमारती तयार झाल्या आहेत. या इमारतींचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. नायगावमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला तीन वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा डिसेंबर 2025 मध्ये देण्याचं नियोजन होतं. मात्र, आता दिवाळीपूर्वीच म्हणजे जवळपास तीन महिने अगोदर ताबा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती म्हाडाचे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील भडांगे यांनी माध्यमांना दिली.
advertisement
चाळीतील एक रहिवासी म्हणाले, "आम्ही जन्मापासून या 180 चौरस फुटांच्या घरात आयुष्य काढलं. आता आमच्या मुलांनी मोठ्या घराचा आनंद घ्यावा, अशी इच्छा होती. म्हाडामुळे ती पूर्णत्वाकडे जातं आहे. दिवाळीपूर्वी घराचा ताबा मिळाल्यास अगदी धूमधडाक्यात आम्ही दिवाळी साजरी करू."
advertisement
आणखी एका रहिवाशाने म्हाडा यंत्रणेचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "म्हाडाकडून वेळेत भाडं मिळालं आहे. आता घर देखील तीन महिने अगोदर मिळत आहे. ज्या परिसरात आयुष्य गेलं त्याच ठिकाणी नवीन मोठं घर मिळत असल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही."
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Naigaon BDD Chawl: बीडीडीवासीयांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार! नायगावात नवीन घरांचा लवकर ताबा देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement