Mhada Konkan Mandal Lottery: म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीला उरले फक्त काही तास, दिवाळी आधीच फटाके फुटणार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mhada Konkan Mandal Lottery: पुढील काही तासांत म्हाडाच्या कोकण विभागाच्या ५ हजार ३५४ घरांची लॅाटरीची सोडत निघणार आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाणे शहर, पालघरमधील वसई आणि सिंधुदुर्गमधील ओरोस येथील ५ हजार ३५४ जणांची यंदाची दिवाळी आठवणीत राहणारी असून या ५ हजार ३५४ जणांचा सण दिवाळीआधीच सुरू होईल. कारण गेली कित्येक वर्षे उराशी बाळगलेले घरांचे स्वप्न काही तासांत पूर्ण होणार आहे. कारण पुढील काही तासांत म्हाडाच्या कोकण विभागाच्या ५ हजार ३५४ घरांची लॅाटरीची सोडत निघणार आहे.
म्हाडाच्या कोकण विभागाच्या लॉटरीकडे लाखो जण आस लावून बसले आहेत. फार कमी वेळा असे होते की १५ टक्के २० टक्के मध्ये जी घरे म्हाडा लॅाटरीत असतात ती घरे नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली असतात. उदाहरण द्यायचे झाले तर नवी मुंबईतील पाम बीच रोड, नेरुळ येथे स्टेशनला लागूनच असलेली टोलेजंग लक्झरी इमारत, डोंबिवलीतील रुनवाल लोढा मधील घरे, ठाण्यात बाळकूम सारख्या महागड्या घरांच्या एरियातील घरे, पालघर, वसई येथील मोक्याच्या ठिकाणीवरील घरे अशी एकूण तब्बल ५ हजार ३५४ घरं आणि सिंधुदुर्ग अंबरनाथ सह विविध भागात तब्बल ७७ भूखंड अशी भली मोठी यादीच यंदा आहे. यांची सोडत शनिवारी ११ तारखेला ठाण्यात होणार असून ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत होणार आहे. या घरांसाठी एकूण १ लाख ८४ हजार ९९४ अर्थ प्राप्त झालेत. यापैकी १ लाख ५७ हजार ४२४ अर्थ अनामत रकमेसह आहेत. यातील फक्त ३ टक्के नशीबवान असतील ज्यांना ५ हजार ३५४ घरांमध्ये घर लागेल.
advertisement
तर, घरांच्या सोडतीत विविध योजनांमधील समावेश आहे… ज्यात आर्थिकदृष्ट्या मागास गट (EWS), कमी उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) असे गट करण्यात आलेत.
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका): यात 1746 सदनिका उपलब्ध आहेत. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 टक्के परवडणाऱ्या सदनिका): यात 41 सदनिका आहेत. 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना: यात तब्बल 3002 सदनिका उपलब्ध आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक योजना: या अंतर्गत एकूण 565 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सदनिकांसह ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत
advertisement
ही घरे ज्या ज्या भागांत आहेत तिथले घरांचे दर गगनाला भिडलेत… 1RK कमीतकमी ३० ते ४५ लाख रुपये, 2 BHK कमीत कमी ६० लाख ते १ कोटी पर्यंत या भागांमध्ये घरांच्या किमती आहेत. तर म्हाडा याच भागांमध्ये अगदी १८ लाखांपासून ते ८४ लाखांपर्यंत घरे विकत आहे
कितीदिवस चाळीत राहणार, किती दिवस सार्वजनिक शौचालयात जाणार, सर्वत्र घाण, छोट्या छोट्या गल्ल्या हे आयुष्य जे जगतायेत त्यापैकी ५ हजार ३५४ जणांना लक्झरी लाईफ स्टाईल जगता येणार आहे ते म्हाडाच्या या घरांमुळे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 09, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mhada Konkan Mandal Lottery: म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीला उरले फक्त काही तास, दिवाळी आधीच फटाके फुटणार