MHADA ची बंपर लॉटरी! पुणे, सोलापूरसह या शहरांमध्ये मिळेल स्वस्तात घर, लगेच करा अर्ज
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Pune MHADA: मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चं घर खरेदी करण्यात अनेक आर्थिक अडचणी येतात.
पुणे: मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चं घर खरेदी करण्यात अनेक आर्थिक अडचणी येतात. अशा वेळी म्हाडा अनेकांना कमी किमतीत हक्काचं घर खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देतं. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील हजारो घरांची विक्री केली जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी (11 सप्टेंबर) करण्यात आला. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते गो-लाईव्ह कार्यक्रमांतर्गत लॉटरीसाठी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
advertisement
या लॉटरीमध्ये, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1683 घरे, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 299 घरे आणि 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत 864 घरांचा समावेश आहे.
म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रिया आणि ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. अनामत रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. अर्जाची यादी 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. 13 नोव्हेंबर रोजी अर्जदारांना प्रारूप यादीवर हरकती नोंदवता येतील. 17 नोव्हेंबर रोजी लॉटरीत सहभाग घेणाऱ्या अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 12, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MHADA ची बंपर लॉटरी! पुणे, सोलापूरसह या शहरांमध्ये मिळेल स्वस्तात घर, लगेच करा अर्ज