PUC नसेल तर पेट्रोल पंपावर आता इंधन मिळणार नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

Last Updated:

प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. जर त्याच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर त्याला इंधन मिळणार नाही, असा मोठा निर्णय मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.

प्रताप सरनाईक (परिवहनमंत्री)
प्रताप सरनाईक (परिवहनमंत्री)
मुंबई : भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे, त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर No PUC... No Fuel योजनेची अंमलबजावणी सक्तीने राबवण्यात येणार आहे, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.
या संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाहन चालकाकडे जर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसेल तर त्याला पेट्रोल पंपावर इंधन दिले जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.

सरनाईक यांच्या खात्याचा नेमका निर्णय काय?

राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून) जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध आहे का नाही हे समजेल! जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
advertisement
तसेच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रला युनिक आयडेंटी (UID)असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने धडक मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PUC नसेल तर पेट्रोल पंपावर आता इंधन मिळणार नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement