advertisement

Ajit Pawar Plane Crash: अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....; Aviation Ministryची पहिली मोठी प्रतिक्रिया

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: लँडिंगच्या अवघ्या एक मिनिट आधी ATC कडून हिरवा कंदील मिळाला, मात्र 'रनवे दिसत नाही' हा वैमानिकाचा शेवटचा संदेश काळजाचा ठोका चुकवणारा ठरला.

News18
News18
नवी दिल्ली/ बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे मिड-साइज बिझनेस जेट Learjet-45 बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी 8.44 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना कोसळले आणि क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, अशी माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने दिली. या भीषण अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला.
मंत्रालयाने ही माहिती बारामती विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकाऱ्याच्या निवेदनाच्या आधारे जाहीर केली आहे. दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या अवघ्या एक मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स देण्यात आली होती.
व्हिज्युअल मेटिओरोलॉजिकल कंडिशनमध्ये लँडिंगचा सल्ला
नागरी उड्डयन मंत्रालयाने स्पष्ट केले की Learjet-45 ला व्हिज्युअल मेटिओरोलॉजिकल कंडिशन्स (VMC) मध्ये लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला होता. म्हणजेच रनवेवरील दृश्यता इतकी होती की पायलटने स्वतःच्या निर्णयक्षमतेवर (visual judgment) विमान जमिनीपासून आणि इतर विमानांपासून सुरक्षित अंतर राखत उतरवणे अपेक्षित होते.
advertisement
मंत्रालयाच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विमानाच्या क्रूने वाऱ्याची दिशा आणि दृश्यतेबाबत माहिती मागितली होती. ATCकडून त्यांना वारा शांत असल्याचे आणि दृश्यता सुमारे 3,000 मीटर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर विमानाने रनवे 11 साठी फाइनल अप्रोचवर असल्याची माहिती दिली. मात्र त्या क्षणी पायलटला रनवे स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी ‘गो-अराउंड’ प्रक्रिया सुरू केली.
advertisement
गो-अराउंडनंतर ATCने विमानाची स्थिती विचारली असता, पायलटने पुन्हा एकदा फाइनल अप्रोचवर असल्याचे सांगितले. ATCने पायलटला रनवे दिसत असल्याची पुष्टी देण्यास सांगितले. त्यावर पायलटने “सध्या रनवे दिसत नाही, दिसल्यावर कळवतो” असे उत्तर दिले.
काही सेकंदांनंतर पायलटने रनवे दिसत असल्याची माहिती दिली, त्यानंतर विमानाला रनवे 11 वर लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पायलटने लँडिंग क्लिअरन्सची अधिकृत पुष्टी दिली नाही.
advertisement
8.44 वाजता आगीच्या लाटा, मलबा जमिनीवर
यानंतर काही क्षणांतच सकाळी 8.44 वाजता ATC अधिकाऱ्यांना रनवे 11 च्या डाव्या बाजूला आगीच्या लाटा दिसल्या. त्या ठिकाणी विमानाचा मलबा कोसळल्याचे स्पष्ट झाले, असे मंत्रालयाने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....; Aviation Ministryची पहिली मोठी प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....; Aviation Ministryची पहिली मोठी प्रतिक्रिया
अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स, पण पायलटने....
  • Ajit Pawar Plane Crash

  • अपघाताच्या 1 मिनिट आधीच विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स

  • पण पायलटने....

View All
advertisement