Beed : पंकजाताईंनंतर धनुभाऊंना धक्का बसणार, खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, दहा दिवस स्कॅनिंग करून...
- Published by:Suraj
Last Updated:
Beed : धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार व विजय आमचाच असेल अशा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : महाराष्ट्राला बीड लोकसभेचा धक्का बसला तसा परळीचा धक्का बसेल. खूप विचार करून उमेदवार दिलाा आहे. परळीमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार व विजय आमचाच असेल अशा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. दहा दिवस स्कॅनिंग करून परळीचा उमेदवार दिलेला आहे. सर्व गोष्टीचा अभ्यास करून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परळीत परिवर्तन होईल. आगे आगे देखे होता है क्या? पवार साहेब येऊन गेल्यानंतर बीड जिल्ह्यातला चित्र बदलेल असंही बजरंग सोनवणे म्हटलं.
advertisement
मी चक्रव्यूहामध्ये टाकत नाही डायरेक्ट अटॅक करतो. धनंजय मुंडे हे स्वतःच्या सावलीलाच भ्यायला लागले आहेत.चक्रव्यूहामध्ये वगैरे काही नाही. जो स्वतःच माणूस स्वतःच चक्र तयार करतो त्याला दुसऱ्याचा चक्र टाकायची गरज काय? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी विचारला.
बीड जिल्ह्याला कृषी मंत्री लाभलेले असताना शेतकऱ्यांना न्याय मिळालाच नाही. कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याची काळजी नाही तर स्वतःला निवडून येण्याची काळजी आहे. पण ते निवडूनही येणार नाहीत आणि सरकारमध्ये ही जाणार नाहीत. बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. महायुतीला हद्दपार करण्याचा ठरवलेलं आहे. महायुतीची घाण काढून सुंदर मनाने महाविकास आघाडीचे सरकार आणण्याच बीडच्या जनतेने ठरवलेल आहे असं मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले.
advertisement
आगे आगे देखे होता है क्या पवार साहेब येऊन गेल्यानंतर बीड जिल्ह्यातला चित्र बदलेल. बीड जिल्ह्यामध्ये उद्या तीन सभा घेऊन बीडमध्ये मुक्काम करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जिल्ह्यात कुठलेही बंडखोरी झालेली नाही.
चक्रव्यूहामध्ये अडकवले म्हणायची वेळ आली याच्यामध्ये त्यांची उंची समजून घ्या. लोकसभा निवडणुकीमध्ये ही जातीचं भांडवल त्यांनी केलं होतं. जात जात नेमकी कोणी काढली? आज भांडवल काय करतात मला चक्रव्यूहामध्ये अडकवला आहे. कशाचा चक्रव्यू आहे? मी अभिमन्यू, मी धनंजय आणि मी अर्जुन हे काय आहे. सगळ्या जनतेला भाषण ऐकायला चांगले वाटतात. इमोशनल करून राजकारण होणार नाही. बीड जिल्ह्यातली जनता परळी विधानसभेची जनता माफच करणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2024 7:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : पंकजाताईंनंतर धनुभाऊंना धक्का बसणार, खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, दहा दिवस स्कॅनिंग करून...


