MPSC Age Limit : एमपीएससीचा मोठा निर्णय, लाखो उमेदवारांना मिळाला दिलासा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमयदित एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला आहे.
MPSC Age Limit : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वयोमर्यादा उलटायच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत यश संपादन करण्यासाठी आणखीण एक वर्ष मिळालं आहे. त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमयदित एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता (मराठा समाज) २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमपीएससीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्या जाहिरातीत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होणार?
advertisement
विशेष बाब म्हणून संधी
'एमपीएससी'च्या १ जानेवारी ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमयदित शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
advertisement
मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भरतीची पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित जाहिराती प्रसिद्धीस आयोगाला २०२४ च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंब झाला आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने उमेदवार अर्ज करू शकत नव्हते. त्यांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.
१) अराखीव (खुला)-३८
२) मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ-४३
कमाल वय
प्राविण्य प्राप्त खेळाडू
advertisement
३) अराखीव (खुला)-४३
४) मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ-४३
माजी सैनिक, आणिबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी
५) अराखीव (खुला)-४३
६) मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ-४३
७) दिव्यांग उमेदवार-४५
ज्या ज्या विध्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे.अशांना आता या निर्णयाने एक संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2024 5:16 PM IST


