MPSC: एमपीएससीचा पुन्हा घोळ, एकाच दिवशी तीन परीक्षा, विद्यार्थ्यांसमोर संकट
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हिती व जनसंपर्क विभागानं तिन्ही पदांसाठी वेगवेगळी नोंदणी फी घेतली असताना, तिन्ही पदांसाठीची परीक्षा एकाच वेळी का? असा सवाल परीक्षार्थी करतायेत.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक आणि वरिष्ठ सहाय्यक संचालक पदासाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा सावळा गोंधळ केल्याचं दिसतंय. तिन्ही पदांच्या परीक्षा एकाच वेळी होणार आहेत. त्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असे संकट विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले आहे.
माहिती व जनसंपर्कच्या उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी आणि वरिष्ठ सहाय्यक संचालक या तीन पदांसाठी एकाचवेळी परीक्षा होणार आहे. 10 मे रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत ही परीक्षा होणार आहे.. त्यामुळं एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची मोठी अडचण झाली आहे. माहिती व जनसंपर्क विभागानं तिन्ही पदांसाठी वेगवेगळी नोंदणी फी घेतली असताना, तिन्ही पदांसाठीची परीक्षा एकाच वेळी का? असा सवाल परीक्षार्थी करतायेत.
advertisement
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवर परीक्षार्थी नाराज आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये आल्यावर ही परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झाली. मात्र आर्थिक मागास प्रवर्ग आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या परीक्षार्थी संभ्रमात आहेत. नेमका कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा याबाबत परीक्षार्थींच्या मनात शंका आहे..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये आल्यावर ही परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झाली मात्र आर्थिक मागास प्रवर्ग आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या निकालसंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आता या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना आक्षेप आहे
advertisement
राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नवीन संकट आले आहे. रात्रंदिवस स्पर्धा परीक्षाच्या अभ्यास करुन सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांची परीक्षा अवघड करण्याचे काम एमपीएससीकडून होत आहे. एकाच दिवशी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांना कुठल्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 06, 2025 9:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MPSC: एमपीएससीचा पुन्हा घोळ, एकाच दिवशी तीन परीक्षा, विद्यार्थ्यांसमोर संकट