मुंबई लातूर व्हाया मुरुड! कधी-कुठे आणि किती वाजता निघणार एका क्लिकवर मिळवा अपडेट्स
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई-लातूर हॉलिडे स्पेशल ट्रेनला 6 वर्षांनंतर मुरुड स्थानकात तात्पुरता थांबा मिळाला आहे. प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 24 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर दर रविवारी ट्रेन धावेल.
गणपती स्पेशल ट्रेननंतर आता नवरात्र, दिवळीसाठी खास हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. दिवाळी निमित्ताने खास मुंबई-लातूर ही हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू आहे. मुंबईहून लातूरला जाणाऱ्या लोकांसाठी आता एक गुडन्यूज आहे. या ट्रेनला मुरुड स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना मुरुडला जायचं आहे तेही या ट्रेननं प्रवास करु शकतात. या ट्रेनला काही दिवसच तात्पुरत्या स्वरुपाचा मुरुड स्थानकात थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवस तरी प्रवाशांसाठी सुगीचे असतील.
लातूर मुंबई नियमीत धावणाऱ्या ट्रेनला मुरुडचा थांबा नियमित होता. मात्र कोरोना काळात मुरुडवर ट्रेन थांबणं बंद झालं. त्यानंतर ट्रेन इथे थांबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. हॉलिडे स्पेशल साप्ताहिक ट्रेनला या स्थानकात थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 6 वर्षांनंतर का असेना हा निर्णय झाल्याने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.
मुरुड परिसरातील प्रवासी व ग्रामस्थांच्या मागणीनंतर, दार विद्यानगर सोसायटीसह विविध संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने मुरुड येथे थांबा मान्य केला आहे. 15 ऑगस्ट रोजी जवळपास 10 हजार लोकांनी यासाठी एकत्र येऊन आंदोलन केलं होतं. त्याला अखेर यश मिळालं, मुरुड येथे थांबा मिळाल्याने मुक्कसह परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला. रेल्वेनं मागणीची दखल घेतल्याने 17 सप्टेंबरला होणारं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
advertisement
मुरु़डमध्ये साधारण 80 हजार लोक राहतात. त्यांना लातूर किंवा हरंगुळ रेल्वे स्थानकात जावं लागायचं, तिथून मग मुरुडला एसटीनी यावं लागत होतं. मात्र आता मुरुड रेल्वे स्थानकात प्रवाशांना उतरता येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते लातूर अशी साप्ताहिक ट्रेन धावेल. दर रविवारी ही ट्रेन 12.55 रात्री निघणार आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मुरुडला पोहोचेल. तर त्याच दिवशी संध्याकाळी 4.50 वाजता ही ट्रेन लातूरहून निघेल आणि सोमवारी पहाटे 4 वाजता मुंबईत पोहोचेल.
advertisement
24 सप्टेंबरपासून ते 26 नोव्हेंबरपर्यंत ही ट्रेन धावणार आहे. 20 फेऱ्या या ट्रेनच्या होतील. आठवड्यातून एकदाच ही ट्रेन असेल. एलटीटीहून ही ट्रेन पकडावी लागेल. या ट्रेनला ख्रिसमसपर्यंत मुदतवाढ देणार की नाही नाही याबाबत तूर्तास तरी कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र नवरात्र आणि दिवाळीसाठी खास ही ट्रेन धावणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई लातूर व्हाया मुरुड! कधी-कुठे आणि किती वाजता निघणार एका क्लिकवर मिळवा अपडेट्स