मुंबईची मोनोरेल बंद राहणार, एमएमआरडीएच्या प्रमुखांची मोठी घोषणा, नेमकं कारण काय?

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून मोनोरेलला अनेक तांत्रिक समस्या भेडसावत असतात. या सततच्या तांत्रिक समस्येनंतर आता मोनोरेल काही काळासांठी बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

mumbai monorail
mumbai monorail
Mumbai Monorail News : मुंबईच्या मोनोरेलमधून दररोज असंख्य प्रवासी प्रवास करतात. या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोनोरेलला अनेक तांत्रिक समस्या भेडसावत असतात. या सततच्या तांत्रिक समस्येनंतर आता मोनोरेल काही काळासांठी बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोनोरेलमध्ये अनेक तांत्रिक समस्या उद्भवत होत्या. गेल्याच महिन्यात प्रवाशांनी भरलेली मोनोरेल मध्येच बंद पडल्याची घटना घडली होती.या घटनेमुळे अनेक प्रवासी गुदमरले होते.त्यानंतर मोनो रेलच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा मनस्ताप होत होता आणि मोठी गैरसौय देखील होत होती.
त्यामुळे सततच्या या तांत्रिक बिघाडावर आता तोडगा काढण्यासाठी मुंबईची मोनो रेल काही काळासाटी बंद ठेवण्यात येणार आहे. एमएमआरडीएचे प्रमुख संजीव मुखर्जी यांनी एबीपीच्या एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे.त्यामुळे आता मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान मोनोरेल नेमकी किती काळ बंद राहणार आहे. किंवा किती दिवस मोनोरेल बंद ठेवण्यात येणार आहे? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.पण या बंद दरम्यान आता मोनोरेलमध्ये येणाऱ्या सततच्या बिघाडावर काम करण्यात येणार आहे.त्यानंतर मोनोरेल पुर्ववत होण्याची शक्यता आहे.
'या' कारणांमुळे मोनोरेल पडली बंद 
मुंबईत सोमवारी प्रचंड पाऊस होता.या दरम्यान देखील चेंबुरच्या दिशेने निघालेली मोनो रेल वडाळा स्टेशनला पोहोचण्याआधीच बंद पडली होती. त्यामुळे अनेक प्रवाशी या रेलमध्ये अडकले होते.या प्रवाशांना नंतर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते.
advertisement
दरम्यान याआधी 19 ऑगस्ट दरम्यान देखील मोनोरेल बंद पडली होती.त्यावेळी मोनोरेलच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने मोनो रेल बंद पडल्याची माहिती देण्यात आली होती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईची मोनोरेल बंद राहणार, एमएमआरडीएच्या प्रमुखांची मोठी घोषणा, नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement