Nagpur News: नागपूरकर झाले बेपर्वा, वाहतुकीचे नियम मोडल्याने 2024 मध्ये दंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे

Last Updated:

सिग्नल तोडणे, अवैध पार्किंग, हेल्मेट न घालणे अशा विविध गुन्ह्यांसाठी नागपूरकरांना दंड आकारण्यात आला आहे.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असले तरी वाहतूक उल्लंघनाच्या बाबतीत मात्र आता वेगळी ओळख निर्माण करत आहे. दळणवळणाच्या अधिक सोयी उपलब्ध होत असताना मात्र नागपुरकरांची खाजगी वाहनांना प्रवासाला पसंती अधिक आहे. याच खाजगी वाहनाच्या प्रेमापोटी नागपूरकर बेपर्वा होत असून वाहतुकीचे नियम मोडण्यात अव्वल होत आहे. सिग्नल तोडणे, अवैध पार्किंग, हेल्मेट न घालणे अशा विविध गुन्ह्यांसाठी नागपूरकरांना 2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी दीड कोटींचा दंड आकारला आहे. पोलीस कारवाई करत असले तरी नागपूरकर पोलिसांना जुमानत नसल्याचं चित्र आहे,
advertisement

नागपूर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई

  • अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 22 हजार 240 नागरिकांवर कारवाई
  • विनापरवाना वाहन चालविणाऱ्या 7,365 नागरिकांवर कारवाई
  • वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या 64,514 नागरिकांवर कारवाई
  • हॉर्न वाजवल्याप्रकरणी 232 नागरिकांवर कारवाई
  • नो पार्किंग वाहन पार्क केल्याप्रकरणी 94,566 लोकांवर कारवाई
  • विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी 8,172 लोकांवर कारवाई
  • ट्रिपल सीट वाहन चालवल्या प्रकरणी 31 हजार 516 लोकांवर कारवाई
  • हेल्मेट न घातलेल्या 8 लाख 92 हजार 803 नागरिकांवर कारवाई
advertisement

14 कोटी 22 लाखांचा दंड

एका बाजूने पोलिसांच्या महसुलाची वाढ होत असताना पोलीस कारवाईने नागपूरकर सुजाण होण्याच्या ऐवजी आणखी बेपर्वा होत असल्याचं समोर येत आहे.  2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याचा एकूण आकडा हा 13 लाख 67 हजार 730 इतका आहे. हाच आकडा 2023 मध्ये 11 लाख 3 हजारांवर होता. 2024 मध्ये झालेल्या कारवाईमुळे वाहतूक पोलिसांना 14 कोटी 22 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
advertisement

नागपूरकर वाहतुकीचे नियम पाळतील का?

नागपूर शहराची लोकसंख्या ही 40 लाखच्या आसपास आहे. त्यातही 12 लाख दुचाकी तर सात लाख चार चाकी वाहन नागपूरकरांकडे आहे. 40 लाखाच्या लोकसंख्येत 14 लाख नागिरकांना दंड होत असेल तर नागपूरकर वाहतुकीचे नियम पाळतील का ?  असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur News: नागपूरकर झाले बेपर्वा, वाहतुकीचे नियम मोडल्याने 2024 मध्ये दंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement