30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष, 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीला खिंडार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nanded News: पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली.
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी देगलूरमध्ये राष्ट्रवादीला सुरूंग लावला असून तब्बल 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष आणि 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रशासकीय नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करणाऱ्या रामदास पाटील यांनी देगलूरमध्ये मुख्याधिकारी म्हणून चांगली कारकीर्द पार पाडली होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा फायदा होणार
नगर पालिकेच्या तोंडावर रामदास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली.
advertisement
राष्ट्रवादीला मोठा झटका
देगलूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाची ताकद होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांना फोडत काँग्रेस प्रवेश रामदास पाटील यांनी घडवून आणला. या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत देगलूरमध्ये राष्ट्रवादीला झटका बसणार असल्याचे दिसत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी मनोरमा नीलमवार यांची उमेदवारी जाहीर
देगलूर येथील काँगेस नगराध्यक्षपदासाठी मनोरमा नीलमवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच देगलूर नगराध्यक्षपदासाठी मनोरमा नीलमवार यांची उमेदवारी जाहीर केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 28, 2025 6:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष, 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीला खिंडार


