Narendra Modi : 'राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करतात, हीच खरी...', पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, हीच त्यांची खरी विचारधारा आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताय.राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, हीच त्यांची खरी विचारधारा आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसला देशाच्या गरीबांना आणि वंचितांना संविधानापासून मिळालेल्या अधिकारांना संपवायचंय. एक वेळ अशी देखील होता जेव्हा काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात वर्तमान जाहीरात द्यायची, असा हल्ला देखील मोदींनी काँग्रेसवर चढवला आहे.
सोलापूरच्या सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे. सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले.त्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडाली होती. तसेच लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली, अशी टीका देखील पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. तसेच महाविकास आघाडी ज्या गाडीवर चालतायत त्याला ना चाक आहेत ना ब्रेक आहेत, असा टोला देखील मोदींनी लगावला आहे.
advertisement
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, राहूल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवू म्हणतात, हीच खरी विचारधारा आहे. काँग्रेसला देशाच्या गरीबांना आणि वंचितांना संविधानापासून मिळालेल्या अधिकारांना संपवायचंय. एक वेळ अशी देखील होता जेव्हा काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात वर्तमान जाहीरात द्यायची, असा देखी टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.
आदिवासी आणि ओबीसी एकत्र येत असल्यामुळे काँग्रेस चिंतेत आहे. हे सर्व एकत्र झाले तर शाही खानदान ला खुर्ची कशी मिळणार म्हणून या सर्व समाजाला विखुरण्याचं काम काँग्रेस करतेय. काँग्रेस पक्ष पाच वर्ष पहात आहे कासार दुसऱ्या जातींसोबत भांडेल, लोहार आणि खटीक यांच्या भांडण लावण्याचा प्रयत्न होत आहे. यातून काँग्रेसला ऊर्जा मिळतेय पण आपल्या सर्वांना एकजूट राहायचं आहे असे म्हणत पंतप्रधान मोदींनी हम एक है तो सेफ है, हम एक रहे तो सेफ रहेंगे,असा पुन्हा नारा दिला.
view commentsLocation :
Solapur
First Published :
November 12, 2024 5:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Narendra Modi : 'राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करतात, हीच खरी...', पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला


