नाशिककरांना मोठा दिलासा, इंदिरानगर बोगदा पुन्हा होणार सुरू, तारीख आली समोर
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तीन महिन्यांपासून बंद असलेला हा महत्त्वाचा बोगदा आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याचे रुंदीकरण आणि ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर बांधकामामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला हा महत्त्वाचा बोगदा आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कामे मुदतीपूर्व पूर्ण करून 26 जानेवारीपासून वाहनप्रवेशाची घोषणा केली आहे. यामुळे शहरवासीयांना आराम मिळणार आहे.
जुन्या बोगद्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 8 मीटरने विस्तार करून नव्या संरचना बांधल्या जात आहेत. नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या योजनेची मुदत 27 जुलै 2026 होती, पण NHAI ने वेग वाढवून एका बाजूने वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कोणाला होणार फायदा?
नाशिक रोड, डीजेपीनगर, वडाळागाव, पाथर्डी फाटा, इंदिरानगर आणि वडाळा भागातील 7 लाखांहून जास्त रहिवाशांना थेट लाभ होणार आहे. उंटवाडी, आर.डी. सर्कल, गोविंदनगर, भुजबळ फार्म, पांगरेनगर, बडदेनगर आणि मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना 20 मीटर अंतरासाठी 1.5 किमीचा वळसा घ्यावा लागत होता, तो आता संपेल.
advertisement
बोगदा बंद असल्याने लेखानगर-गोविंदनगर रस्ता किंवा सर्व्हिस रोडवरून यू-टर्न मारावा लागत होता. यामुळे वेळ आणि इंधनाचा बराच अपव्यय होत होता. आता ही त्रासदायक कोंडी दूर होईल. दरम्यान, राणेनगर बोगदा नुकताच खुला झाल्याने सिडको भागातील वाहतूक सोपी झाली आहे.
तीन-चार महिन्यांचे काम दोन-अडीच महिन्यांत पूर्ण करून 26 जानेवारीला बोगदा सुरू करणार आहोत, असे शशांक आडके, विभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सांगितले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 10:18 AM IST









