BJP: लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसानंतर वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन

Last Updated:

BJP Leader Raj Purohit Passed Away: मुंबई भाजपचा एक अभ्यासू चेहरा, आक्रमक नेतृत्व आणि कुलाबा-मुंबादेवी परिसराचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणारे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचे आज पहाटे निधन झाले.

लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दुसऱ्याच दिवशी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन
लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दुसऱ्याच दिवशी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन
मुंबई: मुंबई भाजपचा एक अभ्यासू चेहरा, आक्रमक नेतृत्व आणि कुलाबा-मुंबादेवी परिसराचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणारे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचे आज पहाटे निधन झाले. ७० वर्षीय पुरोहित यांनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित हे त्यांचे पुत्र आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता.
अखेरची झुंज अपयशी राज पुरोहित यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे १५ जानेवारी रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते, मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
२५ वर्षांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द राज पुरोहित यांनी १९९० पासून मुंबईच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ अशा चार टर्म त्यांनी विधानसभेवर प्रतिनिधित्व केले. केवळ आमदार म्हणूनच नव्हे, तर पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी मुंबईत भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात मोठी भूमिका बजावली.
advertisement
महत्त्वपूर्ण मंत्रालयांचा पदभार १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात त्यांनी कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. विशेषतः गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी मुंबईतील जुन्या इमारतीतील भाडेकरूंच्या प्रश्नावर केलेले काम आजही स्मरणात ठेवले जाते. विधिमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असल्याने ते एक 'संसदीय कार्यतज्ज्ञ' म्हणून ओळखले जात.
advertisement
राज पुरोहित यांच्या जाण्याने मुंबई भाजपमधील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, अनेक दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP: लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसानंतर वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन
Next Article
advertisement
BJP: लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसानंतर वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन
लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसांत वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील
  • कुलाबा-मुंबादेवी परिसराचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणारे राज पुरोहित यांचे निध

  • भाजपचा अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त

  • भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित हे त्यांचे पुत्र आहेत.

View All
advertisement