Nashik Indiranagar Tunnel: मोठी बातमी! नाशिकचा इंदिरानगर बोगदा 9 महिने बंद राहणार, पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Nashik Indiranagar Tunnel: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंदिरानगर बोगदा सोमवारपासून 9 महिने बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.

Nashik Indiranagar Tunnel: मोठी बातमी! नाशिकचा इंदिरानगर बोगदा 9 महिने बंद राहणार, पाहा पर्यायी मार्ग
Nashik Indiranagar Tunnel: मोठी बातमी! नाशिकचा इंदिरानगर बोगदा 9 महिने बंद राहणार, पाहा पर्यायी मार्ग
नाशिक: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इंदिरानगर येथे समांतर नवीन बोगदा उभारण्यात येत आहे. तसेच जुन्या बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी वाढविली जाणार आहे. या नवीन कामाची सुरुवात केली जाणार असल्यामुळे सोमवारपासून म्हणजेच 27 ऑक्टोबर 2025 पासून ते 27 जुलै 2026 पर्यंत इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. नाशिक शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर (एनएच-3)इंदिरानगर बोगद्यावर गोविंदनगर- इंदिरानगर अशा दोन्ही बाजूने 'ग्रेड सेपरेट फ्लायओव्हर' बांधण्यात येणार आहे. यामुळे बोगद्याखालून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच गोविंदनगर, इंदिरानगरच्या बाजूने महामार्गाचे समांतर रस्त्यांवरील सर्व्हिस रोड वाहतूकसुद्धा एकेरी करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त किरिथिका सी.एम यांनी वाहतूक मार्गात बदल केला असून विविध अटी-शर्तीच्या अधीन राहून अधिसूचना काढली आहे. वाहनचालकांनी सर्विस रोडचा एकेरी वापर करावा.
advertisement
असे असणार पर्यायी एकेरी मार्ग 
साईनाथनगरकडून जाणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडे वळण घेत सव्र्हिसरोडने डावीकडे वळण घेत लेखानगरकडे रवाना होईल.
गोविंदनगरकडून येणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडे वळण घेत सरळ मुंबईनाक्याच्या दिशेने रवाना होईल.
advertisement
या मार्गावरून प्रवेश बंद
मुख्य बोगद्यामधून गोविंदनगरच्या दिशेने, मुंबईनाक्याकडून लेखानगरच्या दिशेने समांतर रस्त्यावरून वाहनांना नो एंट्री तर इंदिरानगर सर्व्हिसरोडने मुंबईनाक्याच्या दिशेने येण्यास वाहनचालकांना बंदी असणार आहे.
उड्डाणमार्ग रस्त्याचा दोन्ही बाजूंना
नवीन बोगदा निर्मिती करताना मुख्य महामार्गावरील मुंबईनाका- पांडवलेणी व पांडवलेणी मुंबई-नाका बाजूने येजा करण्यासाठी वाहनांकरिता स्वतंत्र उड्डाणपुलाला समांतर उड्डाणमार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहने त्या उड्डाणमार्गाचा वापर करत खालील वाहतुकीला कुठलाही अडथळा न करता मार्गस्थ होतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Indiranagar Tunnel: मोठी बातमी! नाशिकचा इंदिरानगर बोगदा 9 महिने बंद राहणार, पाहा पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement