मुंबई- दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर नाशिकला समृद्ध करणार? जिल्ह्यांत होणार मोठा आर्थिक बदल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) सिन्नर तालुक्यात भव्य औद्योगिक नगर साकारण्याच्या तयारीत आहे.
नाशिक: मुंबई- दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसर्या टप्प्यात नाशिकचा समावेश निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) सिन्नर तालुक्यात भव्य औद्योगिक नगर साकारण्याच्या तयारीत आहे. या नियोजनाचा भाग म्हणून, 'एनएमआरडीए' मार्फत सिन्नरमधील मोह आणि चिंचोली या दोन गावांमध्ये ही महत्वाकांक्षी औद्योगिकनगर योजना साकारली जात आहे.
202 एकर जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात असून, या प्रस्तावित औद्योगिक शहरात केवळ कारखाने, उत्पादन युनिट्स आणि संबंधित उद्योगांची स्थापना होणार नाही, तर कामगारांसाठी निवास स्थाने आणि आवश्यक पायाभूत सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत.
सुनियोजित शहरासाठी सुविधांची उभारणी
नाशिक हे औद्योगिक शहर औद्योगिक विकासाला गती देऊन त्याला सुनियोजित शहर म्हणून विकसित केले जाईल. त्यासाठी पाणी पुरवठा, वीज, सांडपाणी व्यवस्थापन आणि उत्तम रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे.
advertisement
हे औद्योगिक नगर दोन टप्प्यांत उभे राहणार आहे:
- पहिला टप्पा: 90 एकर
- दुसरा टप्पा: 112 एकर
सध्या मोजणी सुरू असलेल्या 202 एकर जमिनीपैकी, 60 टक्के जमीन शेतकर्यांना भूखंड (प्लॉट) पाडून परत केली जाईल. उर्वरित 40 टक्के जमिनीवर औद्योगिक नगर कार्यालय, कामगारांसाठी निवास सुविधा, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा उभारल्या जाणार आहेत. ही कामे प्रगतिपथावर असून, मे 2026 पर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होतील, असे उद्दिष्ट आहे.
advertisement
45 उद्योगांतून 17 हजार थेट रोजगार निर्मिती
view commentsमोह आणि चिंचोली येथे विकसित होत असलेल्या या औद्योगिक नगरात 200 एकरांवर एकूण 60 औद्योगिक भूखंड उपलब्ध होणार आहेत. 'एनएमआरडीए'चे आयुक्त जलज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 60 भूखंडांवर 45 हून अधिक लहान- मोठ्या कंपन्या सुरू होण्याची शक्यता आहे. "या औद्योगिक नगराच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 17 हजार लोकांना थेट रोजगार मिळण्याचा अंदाज आहे," असे आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले. या विकासामुळे सिन्नर तालुक्यात मोठा आर्थिक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
December 14, 2025 9:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई- दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर नाशिकला समृद्ध करणार? जिल्ह्यांत होणार मोठा आर्थिक बदल










