IND vs PAK : हात मिळवला नाही, पण पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाची लेस बांधून दिली... Photo मधला भारतीय क्रिकेटर कोण?

Last Updated:

अंडर-19 आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर फास्ट बॉलर चर्चेत आला आहे.

हात मिळवला नाही, पण पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाची लेस बांधून दिली... Photo मधला भारतीय क्रिकेटर कोण?
हात मिळवला नाही, पण पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाची लेस बांधून दिली... Photo मधला भारतीय क्रिकेटर कोण?
मुंबई : अंडर-19 आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर फास्ट बॉलर चर्चेत आला आहे. किशनने बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्याने मैदानात केलेल्या कृत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किशन कुमार सिंगने मॅचदरम्यान पाकिस्तानच्या बॅटरच्या बुटाची लेस बांधली. किशन कुमार सिंगचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून त्याचं कौतुक होत आहे.
पाकिस्तानच्या इनिंगच्या 36 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर बॅटर हुजैफा एहसान याच्या उजव्या पायाचा बुटाच्या लेस उघडल्या. यानंतर त्याने लेस बांधण्यासाठी किशन सिंगची मदत मागितली, मग किशनही पुढे आला आणि त्याने हुजैफाच्या बुटाच्या लेस बांधल्या. याचा फोटो कॅमेरामध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर काही वेळात वाऱ्याच्या वेगाने पसरला.

हात मिळवला नाही, पण...

advertisement
भारतीय टीमने हात मिळवला नाही, पण किशन कुमार सिंगने पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाची लेस बांधली. किशन कुमार सिंगने खेळ भावना दाखवली, अशा प्रतिक्रिया पाकिस्तानी चाहत्यांनी दिल्या आहेत. आयसीसीने भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना हात मिळवण्याचं आवाहन केलं होतं, पण भारतीय टीमने आयसीसीचं म्हणणं ऐकलं नाही.

टीम इंडियाचा दणदणीत विजय

या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत 240 रन केले. एरॉन जॉर्जने 88 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली, तर कनिष्क चौहानने 46 रन बनवले. आयुष म्हात्रे 38 आणि वैभव सूर्यवंशी 5 रनवर आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला फक्त 150 रनच करता आल्या. हुजैफा एहसानने 70 रनची खेळी केली. भारताकडून किशन कुमार सिंगने 2 विकेट घेतल्या. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांना 3-3 तर वैभव सूर्यवंशी आणि खिलान पटेल यांनी 1-1 विकेट घेतली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : हात मिळवला नाही, पण पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाची लेस बांधून दिली... Photo मधला भारतीय क्रिकेटर कोण?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement