Beed Crime : दहशत माजवणाऱ्यांविरोधात नवनीत काँवत आक्रमक; बीडच्या चार बदमाश गुंडांची जेलमध्ये रवानगी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बीडमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
बीड : मधल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम होत असल्याचे चित्र आहे. बीडमध्ये कायद्याचे राज्य नसून जंगलराज सुरू असल्याचा आरोप होत असताना बीड जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हेगारांना चपराक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बीडमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार गुंडांची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
बीडमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये तारेख खान मुसाखान, विशाल डांबे, गजानन जाधव व गणेश गिरी यांचा समावेश आहे. या चौघा जणांवर ही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्यांच्या वरील कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता तो मंजूर होताच आता या चौघा जणांची कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.
advertisement
MPDA अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्याच्या विरोधात मकोका व व्यक्तींच्या विरोधात एमपीडीएनुसार कारवाईचे कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गुंडांच्या दहशतीच्या काउंट डाऊनला सुरूवात झाली आहे. आणखी काही टोळ्यांवर आणि गुंडांवर मकोका करण्यात आला आहे. MPDA अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
गंभीर गुन्ह्यांची नोंद
advertisement
बीड, अंबाजोगाई, माजलगाव आणि वडवणी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना हर्सुल कारागृहात पाठवले. एकाच वेळी चार गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाल्याची जिल्ह्यात ही पहिलीच घटना आहे. तारेख मुसा खान, विशाल माणिक तांबे, गजानन सुभाष जाधव आणि गणेश भारत गिरी या गुंडांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, धमक्या देणे, जबरी चोऱ्या, छेडछाड, बाल लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 9:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Crime : दहशत माजवणाऱ्यांविरोधात नवनीत काँवत आक्रमक; बीडच्या चार बदमाश गुंडांची जेलमध्ये रवानगी









