NCP Crisis : राष्ट्रवादीतल्या संघर्षाची निवडणूक आयोगात सुनावणी, अजित पवार गटाचे शरद पवारांवर सनसनाटी आरोप

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावर निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार गटाकडून शरद पवारांबाबत खळबळनक आरोप करण्यात आले.

राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगातल्या सुनावणीत अजित पवार गटाचे शरद पवारांवर आरोप
राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगातल्या सुनावणीत अजित पवार गटाचे शरद पवारांवर आरोप
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावर निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार गटाकडून शरद पवारांबाबत खळबळनक आरोप करण्यात आले. शरद पवारांची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही, एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवत आहे. पक्ष घरच्यासारखा चालवला जात होता. जे निवडून आले नाही, ते नियुक्ती करत होते. त्यांची नियुक्ती वैध कशी म्हणता येईल? असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला गेला.
advertisement
अजित पवार गटाकडून कोणते दावे?
अजित पवारांची निवड कायद्याला धरून करण्यात आली आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही. प्रफुल पटेलांच्या सहीनं सगळ्या नियुक्त्या करण्यात आल्या, प्रफुल पटेल आमच्यासोबत आहेत. विधिमंडळातील बहुमत आमच्याबाजूने, त्याचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, असा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला.
नेत्यांची प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. सर्वात जास्त प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहेत. महाराष्ट्रातील 42 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. नागालँडच्या 7 आमदारांचाही आम्हाला पाठिंबा आहे, असं निवडणूक आयोगात सांगण्यात आलं.
advertisement
अजित पवार गटाकडून शिवसेना प्रकरणाचा दाखलाही देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाही, पक्ष कुणाचा कार्यकर्ते आणि नेते ठरवतात, असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला गेला. पक्षाच्या घटनेनुसार पक्षात काम चालत नाही, पक्ष घटना आणि निर्णय यात बरीच तफावत आहे, असा आरोपही अजित पवार गटाकडून केला गेला.
आम्ही योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, आमच्या कागदपत्रांमध्ये चूक नाही. 30 जूनला अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाध्यक्षपदावर दावा करणारं पत्र दिलं. आयोगाने शरद पवारांना 4 वेळा संधी दिली, पण तरीही त्यांना वेळ हवा आहे. शरद पवारांना परवानगी देऊ नका, असं आवाहनही अजित पवार गटाकडून सुनावणीवेळी करण्यात आलं. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावं, पक्षात फूट आहे का नाही ते तुम्ही ठरवा, असंही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Crisis : राष्ट्रवादीतल्या संघर्षाची निवडणूक आयोगात सुनावणी, अजित पवार गटाचे शरद पवारांवर सनसनाटी आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement