Maharashtra Elections : निवडणूक निकालानंतर नवी समीकरणं? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाकीत

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Assembly Election Result  new equation
Maharashtra Assembly Election Result new equation
सचिन तोडकर, प्रतिनिधी, आंबेगाव, पुणे :  राज्याची यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात युती-आघाडीमध्ये थेट निवडणूक असली तरी यातील सहा घटक पक्ष आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं राजकीय भाकीत केलं आहे. राज्यात निकालानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
राज्यात आघाडी व युती असून दोन्ही बाजूने तीन तीन पक्ष आहेत. निवडणुक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्वाचं असून त्यानंतर खरं गणित सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
निवडणूक निकालानंतर काही समीकरणे बदलू पण शकतात, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. सत्ता स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्यास सरकारची जुळवाजुळव करण्यासाठी आकडेमोड करावीच लागणार असून निवडणूक रिंगणात 6 पक्ष असल्याने गणिते जुळवायला भरपूर वाव असल्याचा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
advertisement
राज्यात अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. तर, जागा वाटपाचा घोळ हा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या. मात्र, महायुती आणि मविआमध्ये मतांचे अंतर फार नव्हते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement

इतर महत्त्वाची बातमी :

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : निवडणूक निकालानंतर नवी समीकरणं? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाकीत
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement