बंगळुरु- मुंबई मार्गावर नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार, नवा मार्ग कसा असणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या बंगळुरू - मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या बंगळुरू- मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. बैठकीत या गाडीला रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शविला.
यामुळे बेळगावहून मिरज- सांगलीमार्गे मुंबई आणि बंगळुरुसाठी आता आणखी एक सुपरफास्ट एक्स्प्रेस मिळणार आहे. मागील 30 वर्षांपासून या दोन शहरांना जोडणारी उद्यान एक्प्रेस सोलापूर- गुंटकलमार्गे धावत आहे. आता त्या सुपरफास्ट एक्स्प्रेसनंतर आणखी एक सुपरफास्ट एक्स्प्रेस सोलापूरकरांना मिळणार आहे.
आता या नव्या एक्सप्रेसद्वारे बेळगाव, हुबळी, धारताड, हावेरी, दावणगेरी हे जिल्हे ही जोडणार आहेत. शिवाय बेळगावमधून ही नवी सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबईसाठी उपलब्ध होईल. बंगळुरुमधून मुंबईसाठी मिरज- सांगलीमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्येही मिरजेसाठी मोजकाच कोटा आहे. तो सुद्धा यामुळे वाढणार आहे.
advertisement
रेल्वेच्या वेळापत्रकाबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तसेच या नव्या गाडीमुळे सांगली- मिरजेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. सध्याच्या गर्दीवर उपाय म्हणून ही गाडी उपयुक्त ठरेल असे मध्यरेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 27, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंगळुरु- मुंबई मार्गावर नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार, नवा मार्ग कसा असणार?


