'हमाम में सब नंगे', निलेश राणेंच्या रेडनंतर नितेश राणेंनी 12 तासांत घेतली ॲक्शन, कोकणातील राजकारण टोकाला

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरात धाड टाकली होती. यावर आता भाऊ नितेश राणे आक्रमक झाले आहेत.

News18
News18
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरात धाड टाकली. त्यांनी थेट बेडरुममध्ये घुसून व्हिडीओ काढला. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरात लाखो रुपयांची अवैध आणि हिशोबी रक्कम आढळली. महायुतीचा भाग असलेल्या निलेश राणेंनी अशाप्रकारे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले, तेव्हापासूनच वेगाने पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर देखील खळबळजनक आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही निलेश राणेंनी केला. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार असून पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा आरोपही देखील निलेश राणेंनी केला.
advertisement
निलेश राणेंच्या या स्टिंग ऑपरेशननंतर कोकणातील राजकीय वातावरण तापलं आहे. निलेश राणेंचे बंधू आणि भाजप नेते नितेश राणेही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या भावालाच इशारा दिला आहे. हमाम में सब नंगे, अशा शब्दात त्यांनी निलेश राणेंना इशारा दिला आहे. तसेच त्यांनी अवघ्या १२ तासांत अॅक्शन घेत, ज्या ठिकाणी निलेश राणेंना पैशांचं घबाड सापडलं, त्या ठिकाणी भेट देखील दिली आहे.
advertisement

नितेश राणे काय म्हणाले?

आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है, असं म्हणत मंत्री आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे कोकणात आता नितेश राणे आणि निलेश राणे या बंधूंमधील राजकीय वाद टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हमाम में सब नंगे', निलेश राणेंच्या रेडनंतर नितेश राणेंनी 12 तासांत घेतली ॲक्शन, कोकणातील राजकारण टोकाला
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement