Nitin Gadkari : 'टोलवाले आणि कंत्राटदारांना तुरुंगात डांबणार अन्...' केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा...

Last Updated:
Nitin Gadkari
Nitin Gadkari
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर: आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा कठोर इशारा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. तुरुंगातील या कंत्राटदार, टोलवाल्यांचे फोटोदेखील काढण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी म्हटले. पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांची गरज अधोरेखित करताना त्यांनी कार्यपद्धतीतील ढिसाळपणावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
नागपूरमधील ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “पूर्वी कंत्राट मिळवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक पात्रतेपेक्षा कोण काळा कोट घालून येतो, हे महत्त्वाचं असायचं. एवढंच ठरवायचं बाकी होतं की त्यालाच कंत्राट द्यायचं, अशी पद्धत होती.
गडकरी यांनी अशा प्रकारच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जे कंत्राटदार दर्जेदार काम करत नाहीत, अपारदर्शक पद्धती वापरतात किंवा टोल वसुलीत गैरप्रकार करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. “कंत्राटदार आणि टोल वाल्यांना तुरुंगात टाकणार आणि त्यांचे फोटो काढणार,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
advertisement
कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरींनी ब्रम्हपुत्रा नदीखालील महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्पाची माहितीही दिली. "12 हजार कोटींच्या खर्चाने ब्रम्हपुत्रा नदीखालून टनेल उभारला जाणार आहे. खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात मी सातत्याने तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास केला," असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे, पण त्या कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त निर्णयप्रक्रिया आणि वेग यांचा समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitin Gadkari : 'टोलवाले आणि कंत्राटदारांना तुरुंगात डांबणार अन्...' केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement