Solapur Fire : आईच्या कुशीतच चिमुरड्याचा होरपळून मृत्यू, शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं

Last Updated:

सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

आईच्या कुशीतच चिमुरड्याचा होरपळून मृत्यू, शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं
आईच्या कुशीतच चिमुरड्याचा होरपळून मृत्यू, शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं
प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये उस्मान मन्सूर यांच्या कुटुंबातील तब्बल चार जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. उस्मान मन्सूर यांच्या नातवाने या दुर्घटनेमध्ये जीव गमावला आहे. रात्री तीनच्या सुमारास अज्ञात कारणावरून टॉवेल कारखान्याला आग लागली, तेव्हा मन्सूर कुटुंब हे दुसऱ्या मजल्यावर झोपले होते.
advertisement
आग लागली त्यावेळेस एक वर्षांचा युसूफ हा आईच्या जवळ झोपला होता. मात्र आगीचा तांडव वाढल्यामुळे जीव वाचवण्यासाठी मन्सूर कुटुंबीय एका खोलीतून बाथरूम मध्ये जाऊन लपले होते, त्यावेळेस आईच्या कुशीत एक वर्षाचा युसुफ विसावला होता. मन्सूर कुटुंबीयांनी एक वर्षांच्या युसुफला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र आग ही काळ बनून आल्यामुळे एक वर्षाच्या चिमुकलेला आपला जीव गमवावा लागला.
advertisement
युसुफबरोबरच त्याच्या आईलाही प्राण गमवावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून जेव्हा आग आटोक्यात आणण्यात आली आणि मृतदेहांचा शोध सुरू झाला त्यावेळेस आईच्या कुशीत एक वर्षाचं चिमुकलं दिसून आलं, यामुळे अग्निशमन दलातील जवानही काही वेळा पुरते भावनिक झाले होते.
पंतप्रधानांकडून मदत
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्यांसाठी पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवो, अशी पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींसाठी 50 हजार रुपयांचा निधी केला जाहीर केली आहे.
advertisement

मुख्यमंत्र्यांकडूनही मदतीचा हात

अक्कलकोट एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या आहेत आठ जणांचा मृत्यू झाला त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. मृत्युमुखी पडलेला मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Fire : आईच्या कुशीतच चिमुरड्याचा होरपळून मृत्यू, शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement