Crime News : बायकोचं लफडं कळाल अन् नवऱ्याने प्रियकराचा गेम केला, धक्कादायक घटनेने पालघर हादरलं

Last Updated:

पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बायकोच्या अफेअरची कुणकुण लागताच नवऱ्याने धारदार शस्त्राने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे.

AI फोटो
AI फोटो
Palghar Crime News : राहुल पाटील,पालघर : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बायकोच्या अफेअरची कुणकुण लागताच नवऱ्याने धारदार शस्त्राने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. हरिश असे या मृत प्रियकराचे नाव होते. पालघरच्या पास्थळमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नवरा बायको फरार झाले आहेत, तर या घटनेचा तपास बोईसर पोलीस करीत आहेत.या घटनेने पालघरमध्ये खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या पास्थळ येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये सुरेंद्र सिंग यांच कुटुंब राहतं. सुरेंद्र सिंग यांच्यासोबत त्यांची बायको देखील या ठिकाणी राहते. सुरेंद्र सिंग यांना त्यांच्या पत्नीचे कुणासोबत तरी अफेअर असल्याचा संशय होता. या संशयातून त्याच्यात सतत भांडणे व्हायची.त्यामुळे सततच्या या भांडणाला कंटाळून दोघांनी घटनेच्या दिवशी प्रियकराला बोलावून वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण वाद संपवता संपवता भलतंच घडलं आहे.
advertisement
त्याचं झालं असं की, बुधवारी मध्यरात्री सुरेंद्र यांच्या बायकोने प्रियकर हरीषला घरात बोलावून घेतलं. या दरम्यान वादावर चर्चा सूरू असताना सुरेंद्र सिंह आणि हरिष यांच्यात बाचाबाची झाली.या बाचाबाचीतून सुरेंद्र सिंह यांनी धारदार शस्त्राने हरिष याची हत्या केली होती.या हत्येनंतर सुरेंद्र सिंह यांच्या बायकोने घटनास्थळावरून पळ काढला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच तो पोस्टमार्टमसाठी देखील पाठवला आहे. तसेच बोईसर पोलिसांनी आरोपी नवरा बायकोचा शोध सूरू केला आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू

खरं तर 27 जुलैला घराघरात बाप्पांचे आगमन झाले.या आगमनानंतर दुसऱ्याच दिवशी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.या दरम्यानच पालघरमध्ये मोठी घटना घडली आहे.पालघरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाबाबू पासवान हा तरूण गणपती विसर्जनासाठी तलावात उतरला होता. मात्र विसर्जना दरम्यान पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू त्याचा मृत्यू झाला. या घटनेने विर्सजनस्थळी एकच खळबळ माजली होती.
advertisement
या घटनेनंतर तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सूरूवात केली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तलावात शोधमोहिम राबवली आणि तरूणाला शोधून काढलं. आता पोलिसांनी या तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेच्या तपासाला पोलिसांनी सूरूवात केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime News : बायकोचं लफडं कळाल अन् नवऱ्याने प्रियकराचा गेम केला, धक्कादायक घटनेने पालघर हादरलं
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement