Palghar Vadhavan Port : वाढवण बंदराचा विरोध पेटला, समुद्रातील सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखलं, पोलिसांनी बजावली नोटीस
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Palghar Vadhavan Port : पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधानंतरही सरकारकडून वाढवण बंदराचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राहुल पाटील, प्रतिनिधी, पालघर: पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधानंतरही सरकारकडून वाढवण बंदराचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढवण बंदराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे वाढवण बंदराचे सर्वेक्षण मच्छिमारांनी बंद पाडले आहे.
वाढवण बंदराला स्थानिक, पर्यावरणवाद्यांसह मच्छिमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.पालघरच्या वाढवण येथे समुद्रात सुरू असलेल सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखले असल्याचे समोर आले आहे. वाढवण बंदर संदर्भात हे सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र सर्वेक्षण करताना कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यामुळे मच्छिमार आणखीच आक्रमक झाले. समुद्रात सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळताच मच्छीमार सर्वेक्षण ठिकाणी धडकले. परवानगी असल्याशिवाय कोणतही सर्वेक्षण करू दिलं जाणार नसल्याचा इशारा मच्छीमारांनी दिला.
advertisement
पोलिसांनी बजावली नोटीस...
सर्वेक्षण सुरू असल्याचे समजाच मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन या सर्वेक्षणाला विरोध केला आणि सर्वेक्षण बंद पाडले. तर, कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग लिमिटेड या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला पालघर पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.
वाढवण बंदराला विरोध का होतोय?
वाढवण बंदराची जागा ही समुद्रातील खडकाच्या रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनासाठी अनुकूल मानला जातो. मात्र बंदर उभा राहिला तर मासेमारीत अडचणी येतील. मुंबई ते दक्षिण गुजरात असा हा पट्टा मत्स्यबीज उत्पादनासाठी सुवर्णपट्टा म्हणून ओळखला जातो. हा पट्टा वाढवण बंदरामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढवण बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल, गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे.
advertisement
वाढवण बंदर ठिकाण हे डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणा अंतर्गत येते. त्यामुळे पर्यावरणवादीदेखील विरोधाच्या भूमिकेत आहेत.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
March 14, 2025 10:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar Vadhavan Port : वाढवण बंदराचा विरोध पेटला, समुद्रातील सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखलं, पोलिसांनी बजावली नोटीस


