Maharashtra Assembly Election : 'बंटेंगे तो कटेंगे'वर भाजपमधूनच विरोध, पंकजा मुंडेंनी म्हटलं, ''या घोषणांची...''

Last Updated:

माझं राजकारण वेगळ आहे. मी भाजपची आहे, म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही,तसेच आपण विकासावर काम केलं पाहिजे असं माझं मत आहे.

घोषणेचा राज्यात विरोधक वेगळा अर्थ काढतात
घोषणेचा राज्यात विरोधक वेगळा अर्थ काढतात
सुरेश जाधव, बीड : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत 'बंटेंगे तो कटेंगे'ची घोषणा दिली होती. आता हीच घोषणा आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन केली आहे. त्यामुळे याच घोषणेची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे.अशात आता याच घोषणेला पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. माझं राजकारण वेगळं आहे. त्यामुळे मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही, असे पंकजा मुंडे एका मुलाखतीत बोलल्या होत्या. त्यानंतर या मुद्यावरून वाद पेटल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता? तो सांगितला आहे.
पंकजा मुंडे यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझं राजकारण वेगळ आहे. मी भाजपची आहे, म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही,तसेच आपण विकासावर काम केलं पाहिजे असं माझं मत आहे.प्रत्येक माणसाला आपलंस करणं हे नेत्याचं काम असतं.त्यामुळे असा कुठलाही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही,असे म्हणत पंकजा मुंडे बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध दर्शवला होता.
advertisement
दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेनंतर आता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. योगी आदित्यनाथ यांचा नारा म्हणजे भाजपला पराजयाची भीती आहे. ज्या ज्या वेळेस विकासाचे मुद्दे नसतात, विरोधात लाट असते बटेंगे तो कटंगे, भारत पाकिस्तान करतात. भाजप पक्ष अडचणीत आले की विधान येतात. तसेच पंकजा मुंडे ओबीसी नेत्या आणि पुरोगामी विचार रुजला आहे. त्या विचारला बाजूला सारून पंकजा मुंडे ,अजित पवार यांना राजकारण करता येणार नाही, त्यामुळे त्यांना विरोध करावा लागत आहे,अशी प्रतिक्रिया विजय वड्डेंटीवारांनी देत भाजपवर निषाणा साधला होता.
advertisement
विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पंकजा मुंडे काहीशा नरमल्या असून त्यांनी या घोषणांवर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखादी घोषणा दुसऱ्या राज्यात वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते.त्याच घोषणेचा राज्यात विरोधक वेगळा अर्थ काढतात. आणि विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी विरोधकांना हा आयता मुद्दा मिळतो. विरोधकांकडे दाखवायला काही नसल्याने ते हे मुद्दे उचलून धरतात. पण अशा मुद्यांमुळे काही गोष्टी भरकटल्या नाही पाहिजेत,असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
advertisement
त्याचसोबत एक आहोत तर सेफ आहोत, म्हणजे आम्ही तीन पक्ष आहोत, आम्ही एक आहोत. महायुती एक आहे,मतदारांनी एक राहावं.. त्यामुळे या घोषणामुळे कुणाला धमकावण, कुणाला दुखावण असा काही अर्थ आहे.असं मला वाटतं नाही,असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election : 'बंटेंगे तो कटेंगे'वर भाजपमधूनच विरोध, पंकजा मुंडेंनी म्हटलं, ''या घोषणांची...''
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement