याला पाडा, त्याला गाडा, तुम्ही जाती-धर्माच्या नावावर..., पंकजा मुडेंचा नाव न घेता जरांगेंवर हल्लाबोल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
याला पाला, त्याला पाडा,पण हे पाडण्याचे राजकारण तुम्हाला का करायचंय? असा सवाल पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंना केला आहे. तुम्ही चांगल्या माणसांना राजकारणापासून दूर ठेवू शकत नाही.
पिंपरी चिंचवड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ही माघार घेतली असली तरी जरांगेंनी पाडापाडी करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंच्या या पाडापाडीच्या इशाऱ्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. याला पाला, त्याला पाडा,पण हे पाडण्याचे राजकारण तुम्हाला का करायचंय? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित करत तुम्ही जाती आणि धर्माच्या नावावर लोकांच्या भावना पेटवतायत, अशी टीका त्यांनी नाव न घेता मनोज जरांगेवर केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगेंच्या पाडीपाडीच्या विधानाचा समाचार घेतला. मला तर काही लोकांच कळतच नाही.याला पाडा, त्याला गाडा, अरे पण का? तो काम करतोय, त्या काम करणाऱ्याला माणसाला टीकवण्याची जबाबदारी आपली नाही का? एक घडी गेली की पिढी जात असते. विसरू नका.मी लोकसभेला साडे पाच, पावणे सहा हजारांच्या मतांनी पडले.त्यावेळी सात ते आठ लोकांनी जीव दिला होता,असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
advertisement
तसेच याला पाला, त्याला पाडा,पण हे पाडण्याचे राजकारण तुम्हाला का करायचंय? असा सवाल पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंना केला आहे. त्याचसोबत तुम्ही केवळ विकास सांगा.तुम्ही जाती आणि धर्माच्या नावावर लोकांच्या भावना पेटवून देऊन,तुम्ही चांगल्या माणसांना राजकारणापासून दूर ठेवू शकत नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी जरांगेंना ठणकावून सांगितलं आहे.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, आम्ही तुम्हाला दर महिन्याला 1500 ओवाळणी देतोय, तुमचा भाऊ तुम्हाला 1000 किंवा 501 देत असेल. पण हे म्हणतात तुम्ही महिलांना गाजर दाखवलं, लॉलीपॉप दाखवलं मग तुम्ही का दाखवलं नाहीस. तुम्ही महिलांचा विचार का केला नाहीत, असा सवाल पंकजा मुंडेंनी विरोधकांना केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 08, 2024 1:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
याला पाडा, त्याला गाडा, तुम्ही जाती-धर्माच्या नावावर..., पंकजा मुडेंचा नाव न घेता जरांगेंवर हल्लाबोल











