Pankaja Munde: भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ, मी गर्जेला पाठीशी घातलं नाही; पंकजा मुंडे कुटुंबियांच्या भेटीला

Last Updated:

गौरी गर्जे हिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी भेट दिली.

News18
News18
बीड : राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहायक अनंत गर्जे याच्या लग्नाला अवघे 10 महिने
झालेले असताना त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अनंत याचे विवाहबाह्य संबंध होते, ही बाब गौरीच्या निदर्शास आलेली होती, त्यामुळे झालेल्या वादातून तिने जीव दिला असं प्रथमदर्शनी दिसून येतंय. मात्र गौरीचे वडील अशोक पालवे यांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. यानंतर दोन दिवसानंतर आज पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे हिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी भेट दिली. यावेळी घडलेला प्रकार ऐकून घेतल्यावर मी कोणाला पाठीशी घालणार नाही, असं आश्वासन दिले आहे.
advertisement
पंकजा मुंडे म्हणाल्या, अनंत गर्जे हा माझा पीए असला तरी तो फक्त एक कर्मचारी आहे. त्याच्या खासगी आयुष्यात काय सुरू होते,याची मला कल्पना नाही. मला माहीत असते तर अनंत गर्जेच्या दोन कानाखालाी लावल्या असत्या. परंतु मला प्रकाराविषयी काहीच माहीत नव्हती. माझ्या कर्मचाऱ्यांच्या घरात काय चालले हे मला कसं माहीत असणार आहे. ज्यावेळी मला प्रकार कळाला त्यावेळी मला धक्का बसला. तो माझा पीए असला किंवा माझा मुलगा असला तरी मी अशा गोष्टींना कधीही पाठीशी घातलं नाही आणि घालणार पण नाही. भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ मी गर्जेला वाचवण्यासाठी पोलिसांना फोन केला नाही आणि कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही.
advertisement

कुणाच्याही आहारी जाऊ नका, जरा धीर धरा : पंकजा मुंडे

माझ्याकडे 10 पीए आणि 36 कर्मचारी आहे. मी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. गणपतीत माझ्या घरी आले त्यावेळी मी म्हणाले काय सुंदर जोडा आहे पण त्यांच्यात काही सुरू आहे मला माहीत नाही. मी अनंत गर्जेला पाठिशी घालणार नाही, पोलिसांना तपास करु द्यायला हवा, एका दिवसात तपास होणार नाही. पोलीस व्यवस्थित तपास करणार आहे. माझी नाचक्की झाली.. मला कोणी कधी सांगितलं नाही... कर्मचाऱ्याच्या घरात काय सुरू मला काय माहीत आहे. कुणाच्याही आहारी जाऊ नका, जरा धीर धरा... तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील.. न्यायदेवतेवर विश्वास ठेवा, असेही पंकजा मुंडे म्हणाले.
advertisement

आत्महत्येआधी गौरी आणि अनंतचे कडाक्याचं भांडण

केईएम हॉस्पिटलमध्ये डेंन्टिस्ट असलेली गौरी हिमतीची होती.आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती असं सांगत तिच्या कुटुंबानं गौरीच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. गळफास घेतलेल्या गौरीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा पती अनंत गर्जे फरार होता. रविवारी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण गेला. रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde: भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ, मी गर्जेला पाठीशी घातलं नाही; पंकजा मुंडे कुटुंबियांच्या भेटीला
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement