Raj-Uddhav Thackeray : जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं, राज ठाकरे थेटच म्हणाले... पाहा Video

Last Updated:

Raj Thackeray On Devendra fadanvis : जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं म्हणताच राज ठाकरेंच्या शब्दानंतर उपस्थित लोकांनी जयघोष सुरू केला.

Raj Thackeray On Devendra fadanvis
Raj Thackeray On Devendra fadanvis
Raj Thackeray Uddhav Thackeray rally : आजचाही मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना इथे यायला मिळालं नाही म्हणून. आता काय स्क्रीनवर आटपा. मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्वव एकाच व्यासपिठावर येत आहोत. जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं म्हणताच राज ठाकरेंच्या शब्दानंतर उपस्थित लोकांनी जयघोष सुरू केला.
महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन जीआर रद्द केले होते. त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाकडून विजयी रॅली आयोजित केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj-Uddhav Thackeray : जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं, राज ठाकरे थेटच म्हणाले... पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement