राजगुरुनगरमध्ये खासगी शिकवणी क्लासमध्ये खून, प्रशासन खडबडून जागे, मोठा निर्णय घेतला

Last Updated:

राजगुरुनगर शहरात सोमवारी इयत्ता दहावीच्या एका विद्यार्थ्याची त्याच्या वर्गमित्रानेच खासगी शिकवणी क्लासमध्ये वार करून हत्या केली.

राजगुरुनगर हत्या प्रकरण
राजगुरुनगर हत्या प्रकरण
सचिन तोडकर, प्रतिनिधी, राजगुरुनगर/पुणे : पुण्याच्या राजगुरुनगर शहराला हादरवून सोडणाऱ्या खासगी शिकवणी क्लासमधील दहावीच्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वर्गातील मित्राने चाकूने वार करून विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर, खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने खासगी शिकवणी क्लासेसच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
राजगुरुनगर शहरात सोमवारी इयत्ता दहावीच्या एका विद्यार्थ्याची त्याच्या वर्गमित्रानेच खासगी शिकवणी क्लासमध्ये वार करून हत्या केली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ज्यानंतर प्रशासन अॅक्टिव्ह झाले असून शहरातील १८ खासगी नोंदणीकृत शिकवणी क्लासेसची सखोल तपासणी करण्यात आली.

प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर, खासगी शिकवण्यांची झाडाझडती

खासगी शिकवणी क्लासेसची सखोल तपासणी करण्यात येणार आहे . यासाठी चार स्वतंत्र पथकांची नेमणूक करून ही कारवाई राबविण्यात येणार आहे . तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
advertisement
यामध्ये अग्निशमन यंत्रणा व त्यांची अद्ययावत स्थिती, सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांची कार्यक्षमता, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शिक्षक व कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे, बायोमेट्रिक उपस्थिती व्यवस्था पाहण्यात येणार आहे, असे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी सांगितले.

मित्रानेच मित्राचा खून केला, क्लासमध्ये रक्तरंजित थरार

पुष्कर दिलीप शिंगाडे (वय १६) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. खून प्रकरणी पुष्करच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कर हा राजगुरूनगरमधील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तीन महिन्यांपूर्वी पुष्करचा वर्गात एका मित्राबरोबर किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून त्याच्या मित्राने पुष्करला संपविले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजगुरुनगरमध्ये खासगी शिकवणी क्लासमध्ये खून, प्रशासन खडबडून जागे, मोठा निर्णय घेतला
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement