"अनिल परब लबाड्या, माझ्या पायाजवळ...", रामदास कदम पुन्हा संतापले

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून केलेल्या टीकेनंतर रामदास कदम विरुद्ध ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अनिल परब-रामदास कदम
अनिल परब-रामदास कदम
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून उद्धव ठाकरे यांच्यावर दसरा मेळाव्यातून टीका केली. या टीकेनंतर रामदास कदम विरुद्ध ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शुक्रवारी परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली. त्यांनी रामदास कदम यांच्या पत्नीवरून आणि त्यांच्या पुतण्याच्या आत्महत्येवरून रामदास कदम यांच्यावर टीकास्र सोडलं.
यानंतर आता रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन अगदी खालच्या पातळीचे शब्द वापरून खालच्या पातळीची टीका केलीय. त्यांनी नीच शब्द वापरला. पण माझा प्रश्न असा की, माझे प्रश्न मातोश्रीचे आहेत. शेवटचे 2 दिवस बाळासाहेब यांची बॉडी अशी ठेवावी का? अशी मागणी मी केली. यावर उद्धव ठाकरे यांनी बोलायला हवं होतं, असंही रामदास कदम म्हणाले.
advertisement
अनिल परबांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, ?याची लायकी नाहीय माझ्या पायसमोर उभं राहायची. आज पक्ष फुटला. सगळे नेते बाहेर आहेत. याचं कारण हा आहे. तो फक्त उद्धव ठाकरेंना चुगल्या करतो. ते हॉटेल्स वरून बोलले. तो डान्स बार नव्हता फक्त ऑर्केस्ट्रा होता. असं नसताना माझ्या मुलाला आणि पत्नीला बदनाम करायचं प्रयत्न आहे. मी याबद्दल कोर्टात जाणार आहे.
advertisement
अनिल परब लबाड्या करायचं आणि शासनाला फसवायचं काम करतो. पहिल्यांदा विलेपार्लेच्या प्रेमनगरमध्ये SRA ची योजना सुरू होती. यावेळी परब यांनी 8 हजार लोकांना शाखेत बसून दम दिल. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. 8 हजार लोकांना घर खाली करायला लावलं. 9 वर्षांपासून हे लोक मुंबईच्या बाहेर आहेत. पैसे खाण्यासाठी हे केलं. हा नीच माणूस आहे, अशा शब्दांत रामदास कदमांनी टीका केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"अनिल परब लबाड्या, माझ्या पायाजवळ...", रामदास कदम पुन्हा संतापले
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement