Beed News: 'तो' पुन्हा बाहेर येणार, धनंजय मुंडेंवर हादरवून टाकणारे आरोप करणाऱ्या व्यक्तीला अखेर जामीन मंजूर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच ही ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा कासले यांनी केला होता.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबाबत गौप्यस्फोट करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल होता. बीड पोलीस दलातून निलंबित केल्यानंतर रणजीत कासलेने अनेक गंभीर आरोप केले होते .
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच ही ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा कासले यांनी केला होता. रणजीत कासले यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाल्मीक कराडला धनंजय मुंडे यांचे कथित गुन्हेगारी प्रकरण माहीत आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाल्मीक कराड नको होते, यातूनच त्यांनी वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर दिली असावी, असा तर्क लावला जात आहे. रणजीत कासले यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका जुन्या प्रकरणात कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत गौप्यस्फोटामुळे बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. एका प्रकरणात त्यांना नुकतेच निलंबित करण्यात आलं आहे. निलंबनानंतर त्यांनी सोशल मीडियातून एकापाठोपाठ एक सनसनाटी आरोप केले आहेत. मात्र कासलेंना आता वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं होतं.
एन्काऊंटर आणि आत्महत्येवरून विविध प्रश्न
advertisement
रणजीत कासलेंच्या एन्काऊंटरच्या दाव्यानंतर आधीच्या काही घटना चर्चेत आल्या आहेत.बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा २३ सप्टेंबर २०२४ रोजी एन्काऊंटर झाला होता. लैंगिक अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळीनं 13 एप्रिल २०२५ रोजी तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली. एन्काऊंटर आणि आत्महत्येवरून विविध प्रश्न विचारले जाता आहेत. त्यातच रणजीत कासलेनं वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा केल्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 13, 2025 7:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: 'तो' पुन्हा बाहेर येणार, धनंजय मुंडेंवर हादरवून टाकणारे आरोप करणाऱ्या व्यक्तीला अखेर जामीन मंजूर









