स्पायडरमॅन सारखा भिंतीवर चढतो, सांगलीत आढळला अजब बेडूक, रंग पाहून सगळे अवाक्
- Published by:sachin Salve
- Reported by:ASIF MURSAL
Last Updated:
सांगली : सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर इथं एक दुर्मिळ पांढरा बेडूक आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा बेडूक इतर बेडकांपेक्षा वेगळा आहे. हा दुर्मिळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो, त्यामुळे त्याला 'स्पायडरमॅन फ्रॉग' असंही म्हटलं जातं. हा बेडूक सध्या गावातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
वेताळपेठ येथील फोटोग्राफर आनंदा राडे यांच्या स्टुडिओत दुर्मीळ पांढरा बेडूक आढळून आला आहे. आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ बेडूक दिसून आला. या बेडकाला 'झाड बेडूक' असंही म्हणतात. याबाबत आंबोली येथील अभ्यासक काका भिसे यांच्या कडून या प्रजातीची खात्री करण्यात आली. 'दुर्मीळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढरा असतो, अशी माहिती भिसे यांनी दिली. त्यामुळेच आनंदा राडे यांनी या बेडकाला सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

advertisement
दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो बेडूक
क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम 1830 मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसंच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो. या बेडकाला 'चुनाम' या नावानंही ओळखले जातं, तर संस्कृतमध्ये याला 'चुर्ण' असं म्हटलं जातं. जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात.
advertisement
बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
view commentsपायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एक झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वतःचा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
Location :
Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
First Published :
May 15, 2025 9:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्पायडरमॅन सारखा भिंतीवर चढतो, सांगलीत आढळला अजब बेडूक, रंग पाहून सगळे अवाक्


