ओवरटेकचा नाद नडला अन् क्षणात सगळं संपलं, बोलेरो-ट्रकची भीषण धडक, चौघांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भंडारा-नागपूर महामार्गावर बोलेरो आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. अपघात बेला येथील साईप्रसाद हॉटेलसमोर रविवारी रात्री घडला.
नेहाल भुरे, प्रतिनिधी, भंडारा - ओवरटेक करण्याचा नाद महागात पडला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बोलेरो कारचा भीषण अपघात झाला. नागपूर महामार्गावर बेला येथील साईप्रसाद हॉटेलसमोर रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील ट्रक आणि बोलेरो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो वाहनाने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की बोलेरोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
अशोक फुलचंद डेहरवाल (48, नागपूर), शैलेंद्र लेखाराम बघेले (34, खापरी, नागपूर), शैलेश पन्नालाल गोकुळपुरे (40, वायुसेना नगर, नागपूर) आणि मुकेश बिंजेवार (32, वाडी, नागपूर) अशी मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत तर अविनाश नाकतोडे हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
April 28, 2025 7:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओवरटेकचा नाद नडला अन् क्षणात सगळं संपलं, बोलेरो-ट्रकची भीषण धडक, चौघांचा जागीच मृत्यू