RSS ने BJP ला दिला महाराष्ट्र जिंकण्याचा फॉर्म्युला; लोकसभा पराभवाची कारणंही सांगितली, Inside Story
- Published by:Shreyas
Last Updated:
महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची भाजपकडून समीक्षा सुरू झाली आहे. मंगळवारी 18 जूनला महाराष्ट्र भाजप आणि आरएसएसच्या शीर्ष नेत्यांची बैठक झाली.
प्रीती एस.
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायची तयारीही दर्शवली आहे. अमित शाह यांनी दखल घेतल्यानंतर फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. पण महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची भाजपकडून समीक्षा सुरू झाली आहे. मंगळवारी 18 जूनला महाराष्ट्र भाजप आणि आरएसएसच्या शीर्ष नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मंथन केलं गेलं. या बैठकीत तीन मोठ्या कारणांबाबत चर्चा झाली. तसंच चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये चर्चा केली गेली.
advertisement
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आरएसएसकडून भाजपबद्दल काही तिखट प्रतिक्रिया आल्या. यानंतर आरएसएस आणि भाजपमधल्या समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित व्हायला लागले. यानंतर मंगळवारी महाराष्ट्र भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आरएसएसकडून पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष उपस्थित होते. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारती पवार, गोपीचंद पडळकर आणि धनंजय महाडिक बैठकीत सहभागी झाले.
advertisement
या बैठकीत आरएसएसने भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युलाही दिला. आरएसएसने भाजपला दलित समाजाला सोबत घ्यायला सांगितलं, तसंच आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. आरएसएसने अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती व्यापक पद्धतीने साजरी करायलाही सांगितली, ज्याचा उद्देश मराठा मतं भाजपसोबत आणणं आहे.
लोकसभा पराभवाची 3 कारणं
आरएसएसने महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाची कारणंही सांगितली. आरएसएस नेते आणि भाजपमध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. यात लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीची समीक्षा केली गेली, ज्यात पराभवाची तीन प्रमुख कारणं समोर आली.
advertisement
1 राष्ट्रवादीला सोबत घेणं, पक्षाचे नेते तर सोबत आले पण कार्यकर्त्यांची साथ मिळाली नाही.
2 शेतकऱ्यांची नाराजी
3 हिंदू मतदार मतदानासाठी घरातून बाहेर पडले नाहीत.
2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 23 जागांवर विजय मिळवला होता, पण या निवडणुकीत भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. जागांच्या बाबतीत महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतरचं मोठं राज्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2024 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RSS ने BJP ला दिला महाराष्ट्र जिंकण्याचा फॉर्म्युला; लोकसभा पराभवाची कारणंही सांगितली, Inside Story