"दादाला माझं नाव सांगतो", बेल्टने तोंड झोडलं; मुंडेचा पुन्हा हैदोस, आणखी एक व्हिडीओ व्हायरल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बीडच्या परळी येथील गित्ते आणि मुंडे या टोळीने या अगोदर एका तरुणाला अमानुष मारहाण केलाचा व्हिडीओ समोर आला आहे.
बीड : परळीत शिवराज दिवटेला अमान माराहाण झाल्यानंतर संतापाचे वातावरण आहे. समाधान मुंडे याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तर दुसरेकडे मुंडे टोळीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये योगीराज गीते नावाच्या तरुणाला बेल्टने अमानुष मारहाण केल्याचा हा व्हिडीओ आहे.
बीडच्या परळी येथील गित्ते आणि मुंडे या टोळीने या अगोदर एका तरुणाला अमानुष मारहाण केलाचा व्हिडीओ समोर आला आहे. शिवराज दिवटे याला मारहाण करणाऱ्या आरोपीमध्ये आदित्य गित्ते ,सचिन मुंडे यांना अटक केली आहे. याच आरोपींनी परळी येथील योगीराज अशोक गित्ते या तरुणास अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी क्रौर्याची आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
दादाला फोन लावून माझं नाव का सांगितलं? या कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. या अगोदर देखील योगीराज गित्ते याला मारहाण करताना अशाच पद्धतीने व्हिडीओ देखील काढला होता. तो प्रकार देखील गंभीर आहे त्यामुळे या व्हिडीओ काढून मारहाण करणाऱ्या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त पोलिस कारवाई कधी करणार असा सवाल विचारला आहे.
advertisement
टोळ्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
बीड जिल्ह्यात अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि दहशत वाजवण्यासाठी वायरल करायचा अशा टोळ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे.महाराष्ट्रामध्ये मारहाण करून त्याचे व्हिडीओ काढले जातात आणि ते व्हिडीओ सोशल माध्यमांवरती व्हायरल केले जातात हे दुर्दैव आहे.
advertisement
अजित पवार बीड दौऱ्यावर
उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणांमध्ये लक्ष घालून जे कोणी असे करते करत असेल आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करत असतील तर अशा लोकांवरती कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 18, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"दादाला माझं नाव सांगतो", बेल्टने तोंड झोडलं; मुंडेचा पुन्हा हैदोस, आणखी एक व्हिडीओ व्हायरल









