संभाजीनगरची शिंदेची शिवसेना संजय शिरसाठ यांच्या घरातून चालते? जिल्हाप्रमुखांच्या आरोपाने खळबळ; शिंदेंची डोकेदुखी वाढली

Last Updated:

फुलंब्रीत अध्यक्षपदासाठी उभे असलेले आणि माजी नगरसेवक यांनी देखील मागच्या आठवड्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेतली ही खदखद जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेनेमध्ये असणारा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. जिल्हाप्रमुखांनीच थेट पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. फुलंब्रीत अध्यक्षपदासाठी उभे असलेले आणि माजी नगरसेवक यांनी देखील मागच्या आठवड्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेतली ही खदखद जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
जिल्हाप्रमुखांना वगळून कार्यकारणी तयार केली जाते आणि ती मुंबईपर्यंत पाठवल्या जाते त्यामुळे पक्षात आता जिल्हाप्रमुखांची गरज नाही ही एकाधिकारशाही आहे. पक्षासाठी सर्व काही पणाला लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच बाजूला केला जात आहे. इतर पक्षांमध्ये घेतलेल्या लोकांना पक्षात स्थान आहे पक्षाचे काम करणाऱ्यांना नाही. मी अनेक वेळा त्यांना विचारणा केली मात्र समर्पक उत्तरे कधीच मिळाली नाही. जे आमच्या विरोधात लढले त्यांना पक्षात घेतलं, त्यांना जवळ केल्या जात आहे त्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय. एकटे पालकमंत्री जिल्ह्याचे शिवसेना चालवत आहेत असे गंभीर आरोप जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केलेत.
advertisement

संजय शिरसाठ काय म्हणाले?

राजेंद्र जंजाळ विद्वान आहे, ते तक्रार करतात त्याचे कारण त्यांना मला माहित आहे, सगळीकडे असे बोंबलत फिरणे, कशासाठी तुम्ही करत आहे याचे उत्तर मिळतील. काही अडचण असल्यास मला सांगितले पाहिजे, त्यांना जिल्हा प्रमुख करण्याचे काम मी केले, अति महत्वकांक्षा वाढल्याने असे होतात,एकहाती पक्ष, असे आरोप केला . ना मनाची नाही तर जणाची लाज वाटली पाहिजे, चांगल्या प्रकारे त्याला उत्तर देऊ शकतो, कुठं जायचे असेल त्यांनी जावे... तुम्हाला इतर पक्षातून आलेले लोक चालत नाही, अशाने पक्ष चालत नाही.... सर्वाना सामावून घेऊन चालावे लागत असतात...वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे.... जिल्हाप्रमुखचे अधिकार त्यांना कळत नाही, असे पालकमंत्री शिरसाठ म्हणाले.
advertisement

अंबादास दानवे यांनी बोलणे टाळले

या संपूर्ण प्रकारावर जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय विरोधक म्हणून असलेले अंबादास दानवे यांनी जास्त बोलण्यात टाळले, त्यामुळे राजेंद्र जंजाळ पुन्हा घर वापसी करतात का असा प्रश्न निर्माण झालाय. नेहमी शिवसेनेतल्या वादावर आणि संजय शिरसाठ, राजेंद्र जंजाळ यांच्यावर राजकीय टीका करण्यासाठी तुटून पडणारे दानवे तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे त्यावर मी जास्त बोलणार नाही अशी बोलकी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
advertisement

आरोपात तथ्य आहे का?

काही दिवसा अगोदर शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला, त्यानंतर फुलंब्री मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आनंद ढोके यांनी अर्ज मागे घेत भाजपवासी झाले. आता राजेंद्र जंजाळ यांची नाराजी खरंच शिवसेनेची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आणणारी आहे. संजय शिरसाट हे एकटेच शिवसेना चालवतात हे आरोप खरे असेल तर येणाऱ्या दिवसात अन्य काही पदाधिकारी पक्ष सोडताना दिसतात की एकनाथ शिंदे यांची शिष्टाई कामाला येते हे पाहावे लागेल
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरची शिंदेची शिवसेना संजय शिरसाठ यांच्या घरातून चालते? जिल्हाप्रमुखांच्या आरोपाने खळबळ; शिंदेंची डोकेदुखी वाढली
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement