Sanjay Raut : 'आम्ही शस्त्रांची पुजा करतोय अन् एकनाथ शिंदे...', राऊतांचा शिंदे गटावर जोरदार हल्ला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शिवसेना उबीटी (Shiv Sena UBT) चे खासदार संजय राऊत दसरा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यातून बोलता त्यांनी संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला सूरुवात झाली आहे.या मेळाव्यातून शिवसेना उबीटी (Shiv Sena UBT) चे खासदार संजय राऊत यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आम्ही शस्त्रांची पूजा करतोय आणि ते (एकनाश शिंदे गट) अमित शाह यांच्या जोड्यांची पूजा करतोय,असा टोला संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेने लगावला आहे.
शिवसेना उबीटी (Shiv Sena UBT) चे खासदार संजय राऊत दसरा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यातून बोलता त्यांनी संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
संजय राऊत म्हणाले, भर पावसामध्ये चिखलामध्ये हजर असलेले निष्ठावंत शिवसैनिक,68 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी जी ठिणगी टाकली आहे,तो मुसळधार पाऊस सुद्धा विझवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचसोबत मराठवाडा ८ दिवस पाण्यात आहे, आता आपल्याला 2 तास पाण्यात मेळावा घ्यावा लागला आहे, त्यामुळे हा आपला ओला मेळावा आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी महायुती सरकारला लगावला.
advertisement
गद्दारांच्या मेळाव्यात शस्त्र पूजन करण्याची गरज नाही.कारण मला कळलं दिल्लीतून अमित शाह यांचे जोडे आणि चपला आणल्या आहेत.त्यामुळे ते अमित शाह यांच्या जोड्यांची पूजा करतील, आम्ही शस्त्रांची पूजा करतोय, असा चिमटा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना काढला.तसेच हे सरकार मत चोरीतून आलं आहे. लोकसभेला चोरी, विधानसभेला चोरी, शिवसेनेची चोरी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चोरी. आता मुंबईतील चोर बाजाराचं नाव मोदी बाजार केलं पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले.
advertisement
आपल्याला रावणाचा दहन करायचा आहे. रावनाला आता पावसात बुडवायचा की जाळायचा याचा विचार करावा लागणार आहे. दिल्लीतला रावण आपल्याला जाळावा लागणार आहे,अशी टीका देखील संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप नेत्यावर केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : 'आम्ही शस्त्रांची पुजा करतोय अन् एकनाथ शिंदे...', राऊतांचा शिंदे गटावर जोरदार हल्ला