'आनंद दीघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न' ; संजय राऊतांची धर्मवीरवर पहिली प्रतिक्रिया
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती आहे. जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे, ते त्यांना आता भाजपच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की धर्मवीर 3 लवकरच येणार आहे. त्याची पटकथा मी लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. आनंद दिघे काय होते सगळ्यांना माहीत आहे. धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहितीय फडणवीसांना माहिती नाही आणि एकनाथ शिंदे यांनाही माहिती नाही.
आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती आहे. जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे, ते त्यांना आता भाजपच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचे जे समर्थक आहेत, ते एकनाथ शिंदेंना मानत नाहीत. त्यामुळे मग हे नवीन प्रतिक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून. आनंद दिघे हे निष्ठावंत शिवसेने नेते होते.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा राजन विचारे दिघे साहेब यांच्या जवळ होते. हे काय गोलमाल १, २, ३ सिनेमा काढत आहेत का? त्यांनी औरंगजेबवर सिनेमा काढला पाहिजे गुजरातच्या औरंगजेबवर सिनेमा काढा अशा शेलक्या शब्दात टीका केली आहे.
अमित शाह यांनी औरंगजेब प्रमाणे राज्यात तंबू ठोकले, तरी राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर होत आहे. ते राज्यातील नेत्यांवर आजूनही गलंबर करत असतील तर त्यांना निकालानंतर समजेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून त्यांच्या हातात राज्याची सत्ता दिली मात्र ती चालवायला ते आजिबात लायक नव्हते. महाराष्ट्राची मराठी जनता त्यांच्या हल्याला चोख उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्राने सगळ्या यंत्रणा वापरून देखील लोकसभेला तुमचा पराभव केला आहे. महाराष्ट्र सगळ्यांचा माज उतरवून देतो. देशाचं संरक्षण आणि मजूर्द्यांचा माज उतरून दिला जातो.
advertisement
फडणवीस यांनी स्वतःची अभिमन्यू सोबत तुलना करू नये, त्यांनी स्वतःला योद्धा समजू नये, तो महाराष्ट्राचा अपमान ठरवला जाईल. अजित पवार यांच्याकडे स्वतःच मतदान असत तर बारामतीत त्यांच्या पत्नी हरल्या नसत्या. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल मतदान हे भाजपच आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2024 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आनंद दीघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न' ; संजय राऊतांची धर्मवीरवर पहिली प्रतिक्रिया