Vinod Tawde : '... म्हणून गृहखात्याने विनोद तावडे यांच्यावर पाळत ठेवली?', संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vinod Tawde Virar rada : विरारमध्ये विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला गेला आहे. त्यावरून राजकारण तापलंय. त्यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. काय म्हणाले राऊत?
Sanjay Raut On Vinod Tawde : निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात उधाण आलंय ते भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यामुळे... विरारमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांनी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली अन् राडा घातला. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली अन् गृहखात्यावर आरोप केले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
भाजपने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी जे काही घडलं ते समोर आलं आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. विनोद तावडे पक्षाचे महासचिव आहेत. बविआचे कार्यकर्ते आले अन् त्यांनी विनोद तावडेंना कोंडून ठेवले. ठाण्यातून खास माणसं मुंबईत पैसे वाटण्यासाठी आणण्यात आले. विनोद तावडे यांच्याकडे १५ कोटी रक्कम होती, त्यातील बविआच्या हातात ५ कोटी लागले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
हितेंद्र ठाकूर यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्याने ठाकूर यांना माहिती दिली. विनोद तावडे भविष्यात जड जातील, राष्ट्रीय महासचिव आहेत. मोदी आणि शहा यांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना अशाप्रकारे पकडून द्यावं, यासाठीच भाजपमध्ये कारस्थान झालं. ज्यांच्याकडे गृहखातं आहे, त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2024 3:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vinod Tawde : '... म्हणून गृहखात्याने विनोद तावडे यांच्यावर पाळत ठेवली?', संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप


