Sanjay Raut : ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊत स्पष्टच बोलले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई महापालिका, राज्यातील 14 महापालिकांसदर्भात निर्णय़ आहे. त्याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. विधानसभेला आता 5 वर्षे आहेत. लोकसभेला मविआला फायदा झाला. विधानसभेला आम्हाला यश मिळालं नाही. त्या अपयशाची कारणं आम्ही शोधू.
Sanjay Raut News : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बुधवारी न्यूज 18 लोकमतशी बोलताना निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली होती.दानवे यांच्या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत बाहेर पडणार? महाविकास आघाडीत फुट पडणार? अशा चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेच्या या विधानानंतर काँग्रेसने देखील स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी फुटते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.अशात आता या सर्व घडामोडींवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. मविआतून शिवसेना ठाकरे गट वेगळा होणार नाही असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. राऊत म्हणाले की, निकाल आताच लागलेत, निकालसंदर्भात सर्वच पक्षांचं चिंतन, मंथन सुरूय. तिन्ही पक्षांना धक्का बसलाय. हे का, याची कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची दिशा पाहिली तर पैसे आणि ईव्हीएमकडे जातं. आम्हाला चर्चा करावी लागेल. राहुल गांधींसोबतही चर्चा केली. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते की आपण स्वतंत्र लढायला पाहिजे होतं, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
advertisement
मुंबई महापालिका, राज्यातील 14 महापालिकांसदर्भात निर्णय़ आहे. त्याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. विधानसभेला आता 5 वर्षे आहेत. लोकसभेला मविआला फायदा झाला. विधानसभेला आम्हाला यश मिळालं नाही. त्या अपयशाची कारणं आम्ही शोधू. कारणं शोधण्यासाठी आम्हाला एकत्र बसावं लागेल. शांतपणे एकत्र विचार केला तर त्यासंदर्भात एकत्र बसूनच निर्णय घेऊ असंही राऊतांनी म्हटलं आहे.
advertisement
पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही. विधानसभेची मुदत २६ तारखेला संपलीय. आम्ही इथं असतो तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं. नियम कायदे फक्त विरोधात असलेल्यांसाठी असतात. बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी आणि कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न असल्याचं राऊतांनी म्हटलं.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी दावा सोडला यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांना असा दावा कसा असू शकतो? यावर बोलायचं नाही. पण ते स्वत:ला शिवसेना समजतात आणि त्यांनी त्यांचे पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये. शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगाने दिलीय. मोदी शहांनी दिलीय. पण नाव शिवसेना आहे. त्या शिवसेनेचे निर्णयाचे अधिकार मोदी शहांना देत असाल तर बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमान, अभिमान हे शब्द न वापरलेले बरे अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2024 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊत स्पष्टच बोलले


