दोन्ही आरोपी मृत डॉक्टरच्या संपर्कात, एकमेकांसोबत बोलणं, आतापर्यंत तपासात काय काय समोर? पोलीस अधीक्षकांनी सगळं सांगितलं

Last Updated:

Maharashtra Satara Phaltan Doctor Death Case: दोन्ही आरोपींच्या पोलीस चौकशीत आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली, हे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांना सांगितले.

तुषार दोशी (सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक)
तुषार दोशी (सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक)
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, फलटण, सातारा : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपी अटक असून दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून दोन्ही आरोपी मृत युवती डॉक्टरच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आल्याचे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणात राज्यभरातून रोष व्यक्त होत असताना विविध राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगला आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वीय सहाय्यकांवर गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या चौकशीची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही आरोपींच्या पोलीस चौकशीत आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली, हे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
advertisement

मेसेज आणि फोनच्या माध्यमातून मृत डॉक्टर आणि आरोपी एकमेकांच्या संपर्कात

दोशी म्हणाले, एका आरोपीची पोलीस कोठडी २८ ऑक्टोबरपर्यंत आहे. तर दुसऱ्या आरोपीची पोलीस कोठडी ३० ऑक्टोबरला संपत आहे. फलटण पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. डॉक्टर आणि आरोपी यांच्यात नेहमी बोलणे होत असे. मेसेज आणि फोनच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते, हे निष्पन्न झाले आहे.
advertisement

त्या हॉटेलचे सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू

मृत डॉक्टर यांच्या हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. येथील डीव्हीआर पोलिसांनी घेतला आहे. सीसीटीव्हीमध्ये हॉटेलचे बुकिंग स्वतःहून घेतल्याचे दिसत आहे. कुठलीही संशयास्पद बाब या ठिकाणी दिसली नाही, असेही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.

तपासावर कुणाचा दबाव आहे का? SP तुषार दोशी म्हणाले...

advertisement
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप झाल्याने तपासावर दबाव आहे का असे विचारले असता, डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावर कोणाचाही दबाव नाही. गृहमंत्र्याच्या आदेशानुसार हा तपास मी निपक्षपणे सुरू आहे, असे तुषार दोशी यांनी स्पष्ट केले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट

डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र पोलीस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून डॉक्टर आणि पोलिसांमध्ये द्वंद्व होते. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीन वेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊन देखील फलटणमध्येच काम करेन, यासाठी तिचा आग्रह होता. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबविण्यात आली होती. पोलिसांनी घटनेतील मोबाईलचा सीडीआर काढला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी डॉक्टर युवती प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या. यावेळी फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला. युवतीचा पीएम रिपोर्ट लगोलग मिळवावा असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिक लॅबचा अहवाल देखील लवकरात लवकर मिळावा यासाठी आदेश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन्ही आरोपी मृत डॉक्टरच्या संपर्कात, एकमेकांसोबत बोलणं, आतापर्यंत तपासात काय काय समोर? पोलीस अधीक्षकांनी सगळं सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement