बोकड आहे की बैल! उंची 5 फूट अन् वजन तब्बल 170 किलो, गुलाम-ए-मुस्तफा पाहिलात का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांनी तयार केलेला गुलाम-ए-मुस्तफा नावाचा बोकड भारतातील सर्वात वजनदार आणि देखणा ठरला आहे. या गुलाम-ए-मुस्तफा बोकडाचे वजन 170 किलो आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने मुस्लिम बांधव बकरे खरेदी करतात. काही रुबाबदार आणि वैशिष्ट्यपूर्ण बकऱ्यांना लाखोंची किंमत मिळत असते. साताऱ्यात असाच एक बोकड असून देशातील सर्वात वजनदार बोकड म्हणून त्याला ओळखलं जातंय. तब्बल 170 किलो वजनाच्या गुलाम-ए-मुस्तफा या बोकडाची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांनी तयार केलेला गुलाम-ए-मुस्तफा नावाचा बोकड भारतातील सर्वात वजनदार आणि देखणा ठरला आहे. या गुलाम-ए-मुस्तफा बोकडाचे वजन 170 किलो आहे. हा बोकड राजस्थान येथील कोटा जातीचा आहे. गुलाम-ए-मुस्तफाच्या खुराक आणि त्याची किंमत यांचं अनेकांना कुतूहल असतं. याबाबतच दस्तगीर बागवान यांनी माहिती दिली आहे.
advertisement
5 फूट उंची अन् 170 किलो वजन
दस्तगीर बागवान यांच्याबाबत मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच म्हटलं जातं. त्यांची स्वतःची उंची कमी असली तरी त्यांनी तयार केलेल्या बोकडांची उंची आणि वजन पाहिलं तर भले भले तोंडात बोट घालतात. यंदा त्यांनी तयार केलेल्या बोकडांची पायापासून कमरे पर्यंत उंची ही चाळीस इंच व पाया पासून शिंगांपर्यंत उंची ही पाच फूट आहे. त्याची लांबी साडे पाच फूट आणि वजन तब्बल 170 किलो आहे.
advertisement
बोकड पाळण्याचा छंद
राजस्थान येथील कोटा जातीचा हा भारतातील सर्वात मोठा बोकड ठरला आहे. नुकतीच त्याची खरेदी पुणे येथील एका व्यक्तीने लाखोंच्या रकमेत केली आहे. दस्तगीर बागवान यांना खूप आधीपासून बोकड पाळायची आवड आहे. दीड वर्षाचा एखादा चांगल्या जातीचा बोकड खरेदी करायचा. वर्षभर त्याचे मुलासारखे संगोपन करायचे. त्याला आवश्यक खुराक द्यायचा, असा त्यांचा नित्यक्रम असतो.
advertisement
कसा असतो खुराक?
रोज दोन लिटर दूध, सुका मेवा, हिरवी तरकारी, सफरचंद, मका, हरभरा, विविध प्रकारच्या डाळींचे मिश्रण हा गुलाम ए मुस्तफाचा रोजचा खुराक आहे. यासाठी दस्तगीर बागवान यांना रोज चार ते पाच तास द्यावे लागतात. शिवाय उन्हाळ्यात त्याच्या साठी स्वतंत्र कुलिंग व्यवस्था, आजारी पडल्यास डॉक्टर ही सर्व व्यवस्था केली जाते. मागील वर्षी त्यांच्या बोकडाचे वजन एकशे तीस किलो होते. या वर्षीच्या बोकडाचे वजन हे विक्रमी ठरले आहे. सध्या या बोकडाची देशभरात चर्चा असून मागील महीनाभरापासून बोकड पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत होती.
advertisement
पुण्यात बोकड पाहायला गर्दी
view commentsगुलाम-ए-मुस्तफा पुण्याला पाठविण्यात आला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. टेम्पोमधून बोकड पाठविताना दस्तगीर बागवान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मन भरून आले. पोटच्या मुलाप्रमाणे आम्ही बोकडाचा सांभाळ केल्याचे दस्तगीर यांनी सांगितले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 16, 2024 7:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
बोकड आहे की बैल! उंची 5 फूट अन् वजन तब्बल 170 किलो, गुलाम-ए-मुस्तफा पाहिलात का?

